पंचकोशविवेक प्रकरणम् - श्लोक १ ते ३
वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.
गुहाहितंब्रम्हा यत्तत् पंचकोशविवेकत: ॥
बोद्धुं शक्यं तत: कोशपंचकं प्रविविच्यते ॥१॥
यत जो प्रत्यगात्मा जाण ॥ तयाचें बुद्धिगुहेंत ठिकाण ॥
तें समजण्या परम कठीण ॥ वाटाडया विण ॥१६॥
वेदा हा जेथील वाटाडी ॥ तया बोलें लंघिल्या कठीण दरडी ॥
पावले गुहा पैलयाडीं ॥ मूनीवर्य ॥१७॥
तेथील तो सकळ देखावा ॥ अज्ञजना समजण्या सुलभ व्हावा ॥
म्हणोनी पंचकोश विवरावा ॥ लागला तयां ॥१८॥
नाना अनेकी भ्रांती ॥ हीच गुहा म्हणोनी थबकती ॥
तया लागीं ही उपपत्ती ॥ सुलभ केली ॥१९॥
जोडावया सत्य कण ॥ कोंडा काढून दाखवती जाण ॥
तैसेंचि हें कोश विवरणा ॥ केलें वाटे ॥२०॥
इया विवरणा वांचून ॥ शक्य न होय वस्तु दर्शन ॥
चिंध्या सोडितांचि जाण ॥ रत्न लाभे ॥२१॥
नाना पाण्यावरील बाबुळी ॥ सारूनी करितां वेगळी ॥
द्दष्टी पैठतसे जैशी जळी ॥ तैसें होय ॥२२॥
देहादभ्यंत्तर: प्राण: प्राणादभ्यंतरं मन: ॥
तत: कर्ता ततो भोक्ता गुहासेयं परंपरा ॥२॥
जड देहाचे डोंगरीं ॥ प्राण गुहा असे अंतरीं ॥
तियेच्याही अभ्यंतरीं ॥ मनो गुहा ॥२३॥
मन गुहेच्या आंत ॥ विज्ञानमय कर्ता राहता ॥
तयाचे ही आंतरांत ॥ भोक्ता आनंदमय ॥२४॥
एवं परंपरा जाण ॥ पंचकोश असती निर्वाण ॥
तयांशीं गुहा उपलक्षण ॥ वेद बोलिला ॥२५॥
वेदें शब्दें दंश केला ॥ जड पोकळ बोलिला सकळां ॥
येथ अर्थ नाहीं म्हणोनी प्राण्याला ॥ सुचना केली ॥२६॥
रायाचा शुद्धा संकेत ॥ करावया अभिव्यक्त ॥
मंत्री जैसा बहु बोलत ॥ तैशा परी ॥२७॥
अन्नमयादि पंचकोश ॥ मुनि बिवरोनी दाविती सावकाश ॥
कधींही न व्हावी मतिभ्रंश ॥ म्हणोनियां ॥२८॥
पितृभुक्तान्नजाद्वीर्याज्जातोऽन्नेनैव वर्धते ॥
देह:सोऽन्नमयो नात्मा प्राक चोर्ध्वं तदभावत: ॥३॥
मातापितरें अन्न भक्षिती ॥ तया पासूनी रेताची उत्पत्ति ॥
तया रेतीं देह प्राप्ति ॥ हें ठाउकें सकळां ॥२९॥
एवं अन्नमय देह जाहला ॥ पुढें अन्नेची वाढूं लागला ॥
म्हणोनी अन्नमय कोश तयाला ॥ बोलिताती ॥३०॥
अन्नाचा जो विकार होतो ॥ तया आत्मा कोण म्हणतो ॥
आद्यंतीं अभाव असतो ॥ जया लागीं ॥३१॥
कार्य म्हणोनि नाशिवंत ॥ आत्मा सदा सर्वदा शाश्वत ॥
एवं अन्नमय कोश नाहीं होत ॥ आत्मा जाण ॥३२॥
वादी - अन्नमय कोशाचा हेत ॥ बोलिला तो असे सत्य ॥
परि तें कार्य आत्मा होत ॥ ऐसें कां न म्हणा ॥३३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 02, 2014
TOP