श्रीआनंद - अध्याय आठवा
श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.
श्रीगणेशायनम: ॥ श्रीगुरुनाथायनम: ॥ प्रणतासी पारिजात । आनंदमूर्ति - श्रीरघुनाथ ।
तन्नाम स्मरतां भवाब्धींत । तराया दुर्गम कायसें ॥१॥
ब्रम्हाग्रह गेला उद्धरोन । गीतारूप दाविलें उपान ॥
तस्करालागीं भेडवून । धनुर्धर - रूप दाविलें ॥२॥
कुलुपांतून जावयास । अवघड नसे श्रीमूतींस ॥
पुष्पें केलीं अपवित्र मांस । जड पाषाण डोलविले ॥३॥
यालागी श्रीगुरुवर्या । गोपालात्मज स्मरोनि पाया ॥
ग्रंथारंभ केला यया । कळसा नेणें तुजकडे ॥४॥
अहो पावा काय मधुर । वाजतो ? बोले अज्ञ नर ॥
निराळा याचा वाजविणार । तिकडे द्दष्टी नच घाली ॥५॥
मंजुळ मैना बोले ‘ताता’ । ऐसें गमे ऐकतां चित्ता ॥
परंतु या बोल बोलविता । निराळा असे उघड हें ॥६॥
साळुंकीचा सूत्रधारी । नाचवीतसे कळाकुसरी ॥
चळण वळण त्यामाझारीं । सूत्रधाराचेंच कीं ॥७॥
असो अम्हां काय कारण । प्रभु बोलवी तें बोलेन ॥
येरवीं बालिश मी गौण । क:पदार्थ गुरुवर्या ! ॥८॥
प्रसाद होईल श्रीमूर्तींचा । तरीच कळस या ग्रंथाचा ॥
येरवीं धिंवसा निदैवाचा । वेश्म उघडा झांकला सम ॥९॥
श्रोते म्हणती कवि - पोषका । वाचाळपणें बोलूं नका ॥
चरितामृत ग्रंथ निका । सुरस चालवी पुढारा ॥१०॥
जी जी प्रसाद म्हणऊन । स्वाम्यंघ्रियुगीं ठेऊनि मन ॥
उन्मेषतुरंग धुडकाऊन । चरितामृतीं धांवडिला ॥११॥
कोणे एके अवसरीं । जयरामस्वामी नाम केसरी ॥
देहावसानीं आयुष्यवारी । आटोन पडलें कोरडें ॥१२॥
तये काळीं श्रीरंगनाथु । गया श्राद्ध करावें या हेतू ॥
गंगास्नानालागी त्वरितु । जावया प्रस्थान पैं केलें ॥१३॥
तैं सांगलीस येऊन । घेतलें आनंदमूर्तींचें दर्शन ॥
महायात्रेचा केला प्रश्न । निघावें आमुचे संगती ॥१४॥
महायात्रेच्या उद्देशीं । निघोन आलों तुम्हांपाशीं ॥
आपण आनंदसुखैकाराशि । महायात्रेस निघावें ॥१५॥
श्रीरघुनाथ स्वामींच्या अस्थी । निक्षेपून ठेविल्या असती ॥
त्याही घेवोन त्वरित गती । अनुगत चलावें आमुच्या ॥१६॥
येरू बोलले जोडूनि हस्त । आपण वदलां तें परम उक्त ॥
परंतु संकोचित येथ । तेंही वदतों स्मामिया ॥१७॥
भाद्रपदींचा उत्साहो । श्रींचा निकट आला पहा हो ॥
साहित्य - सामुग्री - निर्वाहो । मार्गीं केंवी होईल ॥१८॥
उत्साह - दिन न पडतां व्यंग । सर्वोपरि घडावा सांग ॥
श्रीगुरुसेवा निजांगें । मार्गीं केंवी घडों शके ॥१९॥
एतद्विषयीं असे श्लोक । ब्रम्हांड पुराणामाजि एक ॥
तोचि ऐकावा सद्विवेक । ग्रंथीं जें कां बोलिलें ॥२०॥
[संमत श्लोक :--- काशीक्षेत्र - निवासस्तु जान्हवी - चरणोदकं ।
गुरुर्विश्वेश्वर: साक्षात्तारकं ब्रम्हानिश्चितं ॥१॥]
आजि काशी - विश्वनाथ । साक्षात तोचि सदगुरूनाथ ॥
तयाचे चरणोदकें कृतार्थ । होणें दुर्लभ या जन्मीं ॥२१॥
हें ऐकून मग त्यातें । बोलिले श्रीरंगनाथ ॥
उत्साह सांग होणें येथ । व्यर्थ चिंता कासया ॥२२॥
ज्यांच्या पुण्यतिथीचा दिन । तेचि सांग करतील जाण ॥
आतां न करोनी व्यवधान । शीघ्र प्रयाण करावें ॥२३॥
मग श्रीनिकट वृंदावना । येवोन करिती प्रार्थना ॥
मागुती सांगलीस जाणा । येऊनि नमिलें श्रीरंगा ॥२४॥
रात्नौ निद्रावसरीं सुज्ञा । दृष्टांतीं श्रीनें अहो प्राज्ञा ॥
यात्रेस जावयालागीं आज्ञा । केली आनंदमूतींतें ॥२५॥
सर्व करोन तरतूद । प्रयाणास झाले सिद्ध ॥
जयश्री रघुनाथ या शद्बें । पाऊल टाकिलें बाहेरीं ॥२६॥
समागमें शुद्ध करोन । अस्थी कृष्णाजिनीं वेष्टून ॥
रंगानाथ सवें घेऊन । चालिले महायात्रेतें ॥२७॥
पंथ क्रमिला किती एक । वस्तीस शहर पाहिलें देख ॥
तया नगरीं ब्राम्हाण धनिक । वाडा घरहि प्रशस्त ॥२८॥
त्यातें पुसोन उभय मूर्ती । माध्यान्हालागी उतरले वस्ती ॥
शिष्य मंडळी पाक - निष्पत्ती । उद्योग करिती आपुलाला ॥२९॥
स्नान करून उभयतां साधू । जपध्यान - संध्या - विधु ॥
पूजा- सामग्री करून सिद्ध । आरंभ केला पूजेतें ॥३०॥
श्रीपादुका ताम्हानांत । मलापकर्ष स्नान स्थातें ॥
पादुका धुवोन स्वस्थ चित्तें । वस्त्रें निर्मळ पुसियेल्या ॥३१॥
श्रीचे मलापकर्ष स्नानाचें । प्रांजळ तीर्थ श्रीचरणांचें ॥
ताम्हान घेऊन उदकाचें । झुगारिलें स्वैच्छा ॥३२॥
तया सावकाराची वनिता । असे ब्रम्हाग्रह - पीडिता ॥
पडली अंगणीं परम भ्रमिता । निचेष्टिता विस्मरणीं ॥३३॥
पहा केवढा चमत्कार । स्वाम्यंघ्रि - उदकाचा प्रकार ॥
उदक एक बिंदु - मात्र । अंगावर तिच्या उडालें ॥३४॥
समंध अंगीं तिचे होता । सरसरोन झाला बोलता ॥
विस्मय गृहवासी समस्तां । जाहला कौतुक पाहुनी ॥३५॥
येरवीं किती एक दिन । कष्ट भोगिले त्या स्त्रीनें ॥
मुक्त समंध बाधेंतून । होतां मार्ग न दीसला ॥३६॥
पिशाचोपद्रव - परिहारार्थ । बहु यत्न केला सार्थ ॥
हजारों द्रव्य खर्चोन व्यर्थ । जाहले यत्न विफळ ते ॥३७॥
आनंदमूर्तींनें पादुका - । स्नानाचे टाकिलें उदका ॥
तिचा उदय काळ देखा । पूर्व भाग्यें पातला ॥३८॥
या मागें तो पिशाच । बोलविता कांहीं न बोलेच ॥
स्मृतिहीन पाडणें साच । हाचि स्वभाव तयाचा ॥३९॥
आतां तरी ये वेळीं । बोलवितां घरमंडळी ॥
त्यांसी न बोले परि स्वामी जवळीं । लगबगा तो पातला ॥४०॥
करोन साष्टांग नमन । बोलों लागला आपण ॥
याचिया घरीं माझें जाण । वास्तव्य असे बहुकाळ ॥४१॥
याचिया कुळीं कोणी एक । पुरुषें मारीन मजला देख ॥
मम द्रव्य हरितां निष्टंक । पिशाच झालों त्यादु:खें ॥४२॥
याचिये कुळींचा नाश । मागें केला म्यां बहुवस ॥
पुढें तरी या झाडास । मारणार होतों निश्चयें ॥४३॥
आपुले हातींचें तीर्थोदक । मजवरी पडतां बिंदु एक ॥
बुद्धीस जाहला विवेक । हा तों प्रसाद गुरुवर्या ॥४४॥
आतां स्वामी आपुल्या हातीं । मुक्ती घेणें म्यां निश्चितीं ॥
यास्तव देवा कृपामूर्ती । सनाथ केलें पाहिजे ॥४५॥
इत:पर या दुष्ट योनींत । स्वामी नाहीं मी रहात ॥
माझे रुपये पांचशत । या गृहस्थें देणें आहे ॥४६॥
ते रुपये घेऊन । धर्मार्थ आपणां देईन ॥
इतुक्यानें कृतार्थ होईन । इच्छा दुजी नसे जी ॥४७॥
आपण हें द्रघ्य घ्यावें । ब्राम्हाण - संतर्पण करावें ॥
आपणांसमक्ष मी स्वभावें । मुक्ती घेईन निश्चयें ॥४८॥
ऐसें ऐकोन घराचा धणी । येवोन लागला श्रीचरणीं ॥
पंचशत रुपये येच क्षणीं । त्याचे देणेस मी सिद्ध ॥४९॥
परंतु त्याचिये मुक्तीचा । प्रकार पुसोन घ्यावा साचा ॥
पवाडा होईल नांवाचा । देवा आपुला लौकिक ॥५०॥
श्रींनीं काथेलें ब्रम्हराक्षसा । तुझे मुक्तीचा प्रकार कैसा ॥
खचित तूं सांग तैसा । करणेस हे उदयुक्त ॥५१॥
येरू बोले जोदोनि पाणी । पंचशत रुपये घेउनि ॥
आपण विनियोग येच क्षणीं । कळेल तैसा करावा ॥५२॥
मीही निबोनि आपणां सरिसे । येत असे महायात्रेस ॥
पुण्यक्षेत्रीं सावकाश । संयोजीन तव आज्ञे ॥५३॥
म्हणोनि श्रीचरणीं सत्य । ब्रम्हाग्रहें केली शपथ ॥
माझा उदयकाळ यास्तव येथ । आगमन झालें श्रीगुरूचें ॥५४॥
आतां मजवरी करोनि दया । मज काशीस न्यावें स्वामिया ॥
स्वर्धुनी - प्रवाहीं श्रीगुरुवर्या । मुक्ती द्यावी मजलागीं ॥५५॥
इत:पर याचिये कुळीं । बाधा न होय कवणे काळीं ॥
ऐसें उत्तर बद्धांजळी । सावकार ऐकतसे ॥५६॥
त्याच वेळे पंचशत । रुपये आणोन ठेविले तेथ ॥
तेव्हां स्वामी रंगनाथ । पुसते झाले ब्रम्हाराक्षसा ॥५७॥
अरे तुझें हें द्रव्य । आनंदमूर्तींनें खर्चावें काय ॥
कीं ब्राम्हाण - भोजन विधेय । तुजप्रीत्यर्थ सांग पां ॥५८॥
कीं त्याचिये गुरूंची । पुण्यतिथी भाद्रपदींची ॥
तया ब्राम्हाणसंतर्पणाची । सामुग्री करावी तें सांग ॥५९॥
विनयें बोले तो समंध । उत्साहामाजि ब्रम्हावृंद ॥
तृप्त होतां अति आनंद । मजला वाटेल श्रीगुरो ॥६०॥
अवश्य श्रींचे उत्साहीं । खर्चिंतां असंतोष नाहीं ॥
कैसेंही ब्रम्हार्पणीं पाही । विनियोजिजे द्रव्य हें ॥६१॥
रंगनाथ म्हणे आनंदमूर्ती । तुम्हांस चिंता पडली होती ॥
पुण्यतिथीस कोणती युक्ती । सांगा केंवी हों शके ॥६२॥
त्याचलागीं श्रीगुरुनाथें । यजमान उभा केला येथें ॥
धैर्यसंग त्ययोन व्यर्थ । कासाविसी न करणें ॥६३॥
हाचि बोल ग्रुहस्थमंडळी । ऐकते झाले तये वेळीं ॥
विनविते झाले बद्धांजली । उत्साह येथेंचि संपादिजे ॥६४॥
न्यून पडेल जो पदार्थ । पूर्ण करूं जी यथार्थ ॥
अनुद्विग्न करोनी चित्त । सिद्धीस न्यावी कामना ॥६५॥
ऐसें बोलून महानुभाब । गृहीं राहोनि घेतले सर्व ।
सर्व सामुग्री स्वयमेव । पुरविता झाला सार्थप तो ॥६६॥
पुढें पुण्यतिथी दिन प्राप्त । होता जाहला, सामुग्री साहित्य ॥
बोलले त्याहून दशगुणित । देऊनि कृथार्थ जाहला ॥६७॥
तदा त्या समंधाचें द्रव्य । ब्राम्हाण - मोजनीं वेचिलें सर्व ॥
मग तेणेंही तामस भाव । सर्व त्यागिला स्वाम्यंघ्रीं ॥६८॥
उपद्रव घरचा सोडिला । मनोभावें संतुष्ट जाहला ॥
अदृश्य रूपें राहिला । श्रीचरणा सन्निध ॥६९॥
ब्राम्हाणरूपें स्वामीपाशीं । येऊनि लागे चरणांशीं ॥
म्हणे माझी इच्छा जैसी । तैसेंच स्वामी करिजेल ॥७०॥
आतां स्वामी मुक्ती देणें । हेंच वाहतसे अन्त:करण ॥
दुजी कामना यावीण । नसे आपणा श्रीवर्या ॥७१॥
मग तया नगरींतून । समंधा सहवर्तमान ॥
वाराणसी लागून । जाते झाले महात्मे ॥७२॥
समंध बोले श्रीगुरूतें । मुक्ति उत्कंठा असे बहुत ॥
मग त्या समंधासहित । गेले देवधुनी - तीरा ॥७३॥
तेथें कोणी शिष्ट ब्राम्हाण । असणारांस बोलाऊन ॥
त्यांस कथिलें वर्तमान । साद्यंत त्या समंधाचें ॥७४॥
तेही पातले गंगातीरीं । समंध ब्राम्हाण - वेषधारी ॥
श्रीसह सर्वां नमस्कारी । आज्ञा दीजे म्हणतसे ॥७५॥
‘मुक्तोभव’ ऐसीं अक्षरें । वदते झाले विप्रेश्वर ॥
तया सरिसा तो खेचर । स्वर्धुनी - माजि संचरला ॥७६॥
येणें प्रकारें ब्रम्हाराक्षस । श्रीकृपें गेला मुक्तीस ॥
तन्निमित्त ब्राम्हाणांस । संतर्पणही मग केलें ॥७७॥
मग स्वामियें आपुली यात्रा । संपादिली नमोनि क्षेत्रा ॥
गयेस जावया लागीं पवित्रा । प्रयाणातें करिजेलें ॥७८॥
गयेस वट - श्राद्ध करोन । वाराणसीस येती परतोन ॥
येवोन किती एक दिन । काशीवास पैं केला ॥७९॥
येते समयीं प्रयाग - ॥ मकरस्नान संपादिलें सांग ॥
देशीं येणेचा उद्योग । करिते झाले तेथुनी ॥८०॥
श्रीवृंदावनीं कृष्णथडी । दर्शनीं उदेली आवडी ॥
रंगनाथासह तातडी । येवोनि पोंचले वडगांवीं ॥८१॥
श्रीवृंदावनीं कृष्णथडी । दर्शनीं उदेली आवडी ॥
साधु मंडळी समस्तांतें । प्रेमालिंगन दीधलें ॥८२॥
मग पावले ब्रम्हनाळीं । सन्मुख गेली सर्व मंडळी ॥
पुत्नमित्रादिक इष्ट सकळीं । नमस्कारिलें श्रीपाद ॥८३॥
दुसरे दिनीं गंगाराधना । मावंदें ठाउक सर्व जनां ॥
तें संपदोनिया जाणा । यात्रा समाप्त पै केली ॥८४॥
गोपाळात्मज विनवी श्रातयां । ग्रंथार्थ जा ला येथोनिया ॥
तुमचे प्रसादें स्वामिया । सिद्धीस जाईल तो जावो ॥८५॥
मी कर्ता हा अभिमान । वाही तो शतमूर्ख जाण ॥
एका श्रीगुरुकृपेविण । कांहींच नोहे हें सत्य ॥८६॥
असो त्याविणें काय काज । मी अल्पमती बालिश सहज ॥
आतां संत - चरणास निज । नमस्कार साष्टांग घालितों ॥८७॥
इति श्रीआनंदचरितामृत । बापानंद - विरचित ॥
श्रवण करोत साधूसंत । अष्टमोध्याय गोड हा ॥८८॥
॥ श्रीरघुनाथार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP