श्रीआनंद - भूपाळी १
श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.
उठोनि ब्राम्हीं मुहूर्तीं । चिंतावी गुरुमूर्ती । संत हौनी संतीं । संत व्हावें ॥१॥
श्रीराम जयराम । जयराम राम राम । अखंड निजप्रेम रामरूपीं ॥घृ॥
असत निरसूनी । सद्गुरुबोध मनीं । मनातीतपणीं । राम व्हावें ॥२॥
बोधामृत सुख । निरसुनी महादु:ख । सद्गुरू कृपा ऐक्य । नित्य व्हावें ॥३॥
मायामृगजळ नाहीं नाहीं केवळ । मायाविद्या जाळ । वृथा जेथें ॥४॥
सत्यज्ञानरूप । आनंदें अमूप । श्रीरामीं तद्रूप । सहज व्हावें ॥५॥
होणें जाणें नाहीं । नाहीं भोक्त भोगणें । स्वदेहजग - जाणे । फल्गु झालें ॥६॥
सद्गुरु कृपाबोधें । स्वानंदें निजछंदीं । आनंद रामपदीं । मुक्त झाला ॥७॥
॥ श्रीरामजय० ॥घृ०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP