उत्तरमेघ - श्लोक ३६ ते ४०
महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.
(३६) एणाक्षी जी युवति, सुदती, पक्वबिंबाधरा जे ।
नाभी जीची सखल, कटितें पाहुनी सिंह लाजे ॥
श्रोणीभारें अलसगमना, नम्र पीनस्तनांही ।
तन्वी, योषासृजनिं विधिची आद्यसृष्टी जणूं ही ॥
(३७) जाणीं माझें ह्रदयचि दुजें, ती प्रिया अल्पभाषी ।
होतां दूर प्रियजन तिचा, एकली जी उदासी ॥
गाढोत्कण्ठा, दिन बहुल हे, जी प्रयासेंचि गाळी ।
वाटे झाली शिशिरमथिता पद्मिनीशी निराळी ॥
(३८) नेत्रीं तीच्या रडुनि रडुनी आकसें सूज आली ।
उष्णोश्वासें अधरपुटिंची रक्तिमा नष्ट झाली ॥
हातीं ठेलें मुख अधिकसें झांकलें लांब केशीं ।
इंदू जैसा त्वदनुसरणें हीनकांती दिसेची ॥
(३९) गत्वा सद्य: कलभतनुतां शीघ्रसंपातहेतो:
क्रीडाशैले प्रथमकथिते रम्यसानौ निषण्ण: ।
अर्हस्यन्तर्भवनपतितां कर्तुमल्पाल्पभासं
खद्योतालीविलसितनिभां विद्युदुन्मेषद्दष्टिम् ॥
(४०) तन्वी श्यामा शिखरिदशना पक्वबिम्बाधरोष्ठी
मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निन्मनाभि: ।
श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्रा स्तनाभ्यां
या यत्र स्याद्युवतिविषये सृष्टिराद्येव धातु: ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP