उत्तरमेघ - श्लोक ६१ ते ६५

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(६१) ठेवी माझ्यावरि तव सखी प्रेम अत्यंत तेणें ।
कल्पीं तीची प्रथमविरहें ही अवस्था मनानें ॥
मिथ्या मातें वदवि नच हें, फोल सौभाग्यगर्व ।
थोडया कालें तुज कथियलें देखसी तेंच सर्व ॥

(६२) होतां केशावृत, नच जया फेंकितां ये कटाक्ष ।
गेला तैसा विसरुनि, सुरा सूटतां, भ्रूविलास ॥
जातांची तूं जवळि, मुकला काजळा, नेत्र डावा ।
मीनोत्थानें कमलदलसा पापणीनें स्फुरावा ॥

(६३) आतांशा जी ममनखकृतां प्रेमचिन्हां वरी न ।
मोत्यांच्याही चिरपरिचितें जालकें जी विहीन ॥
संभोगांतीं हळु हळु करें, नित्य जी मी चुरावी ।
डावी मांडी; तशिच, कदलीस्तंभगौरा, स्फुरावी ॥

(६४) तैशा कालीं, जलधर ! जरी ती सुखें झोंप घेई ।
तेथें तीची प्रहरभर तूं मूकसा वाट पाही ॥
स्वप्नीं तेव्हां दयित तिज मी लाधलों जों सुदैवें ।
गाढाश्लेषांतुनं नच तिनें तत्क्षणीं वेगळावें ॥

(६५) तीतें जागी करुनि पवनें, शीतशा स्वांबु - जालीं ।
होतां ताजी, विकसित कळीं जाइची कीं जहाली ॥
जीची, विद्युत्सख  ! बससि तूं त्या गवाक्षीं खिळेल ।
द्दष्टी, तीतें, चतुर ! सुगिरा गर्जुनी हीच बोल ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP