पिंगळ्याचे गाणे १
लोकांसाठीच व लोकांसंबंधीच, लोकांनी रचलेली गीते म्हणजेच लोकगीते. भावना उत्कट होऊन ओठावर येणारी गीते.
पिंगळा बोलला. पिंगळा बोलला
कुड कुड कुड रं
उठा उठा ग बायानू फाटफटया पाराला
जोगी आला दारात. धर्म येळात हो.
पांगूळ सांगे विठ्ठल नाम घ्या हो.
अरे कुणी मायबाप नावानं
रामपार्यात धर्म करा.
पांगूळ आलाय
कुणी देवाधर्माच्या नावानं द्या
पुण्याची जोडण कराया दान द्या
पांगूळ आलाय. रे.
पाऊड पावलं हो दाङ ऽऽ
जोगीयाच्या, अंबाबाईला पाऊड पावलं.
जेजुरीच्या खंडोबाला पाऊड पावलं हो ऽ
ऐसेचा पांगुळासि कादू दीजे
आयांनो. बायांनो, पांगूळ आला वो
सीता सावित्रींनो, पांगूळ आला हो
पाटील - कुळकर्ण्या, पांगूळ आला हो
राम - लक्ष्मण पांगूळ आला हो
बेचाळीस कुळांचा उद्धार
भाईबंदाची जोडी सलामत
पाचाचे पन्नास व्हावे
दोन्ही कुळांचा उद्धार
सदाशिवाचा भक्त असेल
पांगुळाला दान देईल
आईबापाला दान देईल
दान पावलं रे. दान पावलं
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP