त्रिसंध्यं प्रजपेन्मंत्रं पूजनं तत्समं भवेत् । एकदा वा भवेत्पूजा न जपेत्पूजनं विना ॥
इति गोतमीयवचसा जपात्पूर्वं देवतापूजनं विहितं, पूजनं विना जपनिषेध उक्त:, अत एव पूजनविषये किंचिदुच्यते ।
उपासनायामिष्टदेवतापूजनं प्रधानमङ्गम् ।
तेन हि देवता संतुष्यति, श्रद्धया कृतपूजनेन आत्मनि द्दढविश्वास आहलावदश्च समुत्पद्यत इति प्रत्यहं देवतापूजनं कर्तव्यमेव ।
तत्र आचारग्रंथेषु उपचारभेदाद्दशविधापूजाभेदा: समुपवर्णितास्ते च यथा - पूजैकेनोपचारेण द्वित्रिपंचभिरेव च ।
उपचारैश्च दशभिस्तथा षोडशभिश्च तै: ॥
द्वात्रिंशदुपचारैश्वाष्टचत्वारिंशता च तै: ।
चतु:षष्टया शक्त्यशक्यनुसारेण बहव: पक्षा उक्तास्ते च तत्र द्रष्टव्या: ।
अथ उपचारा नाम - उपचर्यते सेव्यते देवता यैस्ते उपचारा: ।
इष्टदेवताप्रीत्यर्थं पूजायामुपयुज्यमाना द्रव्यविशेषा: क्रियाविशेषा भावनाविशेषाश्चेति यावत् ।
गंधपुष्पादय: द्रव्यविशेषा:, प्रदक्षिणानमस्कारादय: क्रियाविशेषा:, ध्यानावाहनादय:भावनाविशेषा:, मुख्यदेवतार्पणेनांगदेवतार्पणेन च तत्प्रीतिजननाश्चेति - चं. दी. ।
नैकविधेषु पूजाप्रकारेषु षोडशोपचारपूजाप्रकार एव प्राय: सर्वत्राद्रियत इति तदनुसारेणैव विचार: क्रियते ।
अर्थ :--- प्रथम सर्वसाधारण देवपूजाविधीबद्दल माहिती लिहितों -
प्रात:काल, माध्यान्ह व सायंकाल असा त्रिकालीं जप कर्तव्य असेल तर उपासकानें त्रिकाल पूजन करावें. दोन वेळ वा एक वेळ जप कर्तव्य असेल तर त्या त्या वेळीं
इष्टदेवतापूजन करून जप करावा. पूजन केल्यावांचून जप करूं नये. या गोतमीय वचनानें पूजनावांचून जप करूं नये असा स्पष्ट निषेध केला असल्यानें उपासनेंतील
पूजा हें प्रधान अंग ठरतें. कारण पूजनानें देवता संतुष्ट होते. पूजनानें देवतेच्या विषयीं प्रेम, व ही देवता आपली रक्षणकर्त्री आहे असा द्दढ विश्वास आपले ठिकाणीं उत्पन्न होतो आणि मनाला समाधान व आनंद वाटतो, म्हणून प्रत्येकानें नित्य देवतापूजन करावें. आचाररत्नादि आचारग्रंथांतून उपचारभेदानें १-२-३-५-१०-१६-३२-४८-५४-८० असे दहा प्रकारचे पूजाभेद सांगितले आहेत. ते त्या ग्रंथांत पाहावे. कांहीं पूजाभेद मी पुढें सांगणार आहें. प्रथम उपचार शब्दाची व्याख्या सांगतों. ‘तत्र उपचारा नाम उपचर्यते सेव्यते देवता यैस्ते उपचारा:’ -
ज्यांनीं देवतेची सेवा केली जाते व ज्यामुळें देवतेला प्रीति उत्पन्न होते त्याना उपचार म्हणावें. हे उपचार - द्रव्यविशेष, क्रियाविशेष व भावनाविशेष असे तीन प्रकारचे आहेत. गंधपुष्पादि पदार्थ समर्पण करणें हे द्रव्यविशेष, द्रव्य म्हणजे पदार्थ, प्रदक्षिना - नमस्कारादि हे क्रियाविशेष. ध्यान - आवाहनादि हे भावनाविशेष होत. यांच्या समर्पणानें प्रधानदेवता व अंगदेवता यांना संतोष होतो. भक्ताविषयीं देवतेच्या अंत:करणांत वात्सल्यबुद्धि उत्पन्न होते. पूजाभेद अनेक असले तरी प्राय: षोडशोपचार पूजा हाच भेद सर्वत्र स्वीकारला जातो. म्हणून षोडशोपचारपूजेबद्दलच मी लिहितों.