मयूखे - मासपक्षतिथीनां च निमित्तानां च सर्वश: । उल्लेखनमकुर्वाणो न तस्य फलभाग्भवेत् ॥
सिंहस्थपद्धतौ - “अब्दायनर्तुमासाश्च पक्षतिथ्यृक्षवारकम् ।
योगश्च करणं चेति संकल्पे काल इष्यते” निर्णयसिन्धौ - स्मरेत्सर्वत्र कर्मादौ चांद्रं संवत्सरं तथा ।
नान्यं यस्माद्वत्सरादौ प्रवृत्तिस्तस्य कीर्तिता ।
अत्र चांद्रसंवत्सरपदं मासादेरप्युप्लक्षणम् - तदाह तत्रैव त्रिकाण्डमंडन :--- श्रीतस्मार्तक्रिया: सर्वा: क्रुर्याच्चांद्रमसर्तुषु इति ।
तेन संकल्पे चांद्रऋतुमासादीनां ग्रहणं भवति ।
अयं च संकल्प: पुण्यकर्मसु श्रौतस्मार्तादिकर्मस्वावश्यक: धर्मस्य हेतुभूतत्वात् ।
न लौकिकद्दष्टार्थेषु शौचभोजनशयनादिषु इत्याचाररत्ने ।
अर्थ :--- मयूखामध्यें संकल्पाच वेळीं मास, पक्ष, तिथि, इतादींचा उल्लेख अवश्य करावा असें आहे. सिंहस्थपद्धतीमध्यें - संवत्सर, अयन, ऋतु, मास, पक्ष. तिथि, वार, नक्षत्र, योग व करण या कालावयवांचें संकल्यवाक्यांत उल्लेखन करणें, हे संकल्पाचॆं स्वरूप आहे. अलीकडे पंचांगांतून सौरपद्धतीचे मास, ऋतु, अयन इत्यादि लिहिले जातात. ते संकल्पवाक्यांत न घेतां चांद्र संवत्सर, चांद्र ऋतु. चांद्र मास यांचाच संकल्पांत उच्चार करावा. असें निर्णयसिंध्वादि धर्मशास्त्रीय ग्रंथांत स्पष्ट आहे. हा संकल्प पुण्यफलाला हेतुभूत असल्यानें कोणत्याही श्रौतस्मार्त कर्माचे वेळीं यांचा उच्चार करावा. मलमूत्रोत्सर्ग, भोजन, शयन, इत्यादि लौकिक कर्मांत संकल्याची आवश्यकता नाहीं असें आचाररत्नांत आहे.