स च पूजादे: संकल्प: संध्यावंदनोत्तरं कार्य: । संध्याहीनोऽशुचिर्नित्योऽनर्ह: सर्वकर्मसु इति दक्षोक्ते: । एवं संकल्पं विधाय निर्विन्घार्थं गणेशपूजनं स्मरणं वा पुरुषसूक्तेन षोडशांगं षडंगं वा न्यासं शरीरशुद्धयर्थं कृत्वा कलशशंखघंटा: पूजयेत् । सूर्यशिवार्चने तु शंखपूजानिषेध: । तत:- प्रथमं देहशुद्धि; स्यात् स्थानशुद्धिरनंतरम् । ततश्च पात्रशुद्धि: स्यादात्मशुद्धिश्चतुर्थिका ॥ पंचमी वित्तशुद्धि: स्याच्छुद्धय: पंच संस्मृता:- इति वचनात् अपवित्र: पवित्रेति मंत्रेण आत्मशुद्धिं द्रव्यपदार्थादिशुद्धिं च कृत्वा इष्टदेवतां ध्यायेत् ।
ध्यानं नाम - उपास्यदेवताया: हृत्कमले स्वरूपावलोकनं चिन्तनं च । तदुक्तं याज्ञवल्क्येन - समाहितेन मनसा चैतन्यांतरवर्तिना । आत्मनोऽभीष्टदेवस्य चिन्ता ध्यानमिहोच्यते ॥
एवं सामान्यजनानां हृत्कमलसंस्थस्य परमेशस्य ध्यानं कर्तुमशक्यत्वात्संप्रति पूज्यदेवतास्वरूपवर्णनात्मकमंत्रपाठेन श्लोकपाठेन च वाचिकं ध्यानं कुर्वन्ति शिष्टा: । तत्र च ध्यायेत् ध्येय: इत्यादिविधिबोधकपदघटितवाक्यापेक्षया वन्दे विष्णुं, ध्यायामि रामं, दुर्गां त्रिनेत्रां भजे इत्यादिस्वकर्तृकदेवताकर्मकपदघटिश्लोकानां पाठो युक्त: इति चं. दीपिकायाम् ।
अर्थ :--- पूजादि कर्माचा संकल्प संध्यावंदनोत्तर करावा. संध्या केल्यावांचून कोणतेंहि अन्य सत्कर्म करण्याचा अधिकार नाहीं असें दक्ष म्हणतो. त्याचप्रमाणें संकल्पानंतर गणेशपूजन वा स्मरण, शरीरशुद्धयर्थ षोडशांग वा षडंगन्यास करुन कलश, शंख, घंटा, दीप, यांचें पूजन करावें. सूर्य व शंकर यांचे पूजनांत शंख वर्ज्य आहे. शुद्धि पांच प्रकारची आहे. देहशुद्धि. स्थानशुद्धि, पात्रशुद्धि, आत्मा - मन:शुद्धि आणि द्रव्यशुद्धि. ‘अपवित्र: पवित्रो वा’ या मंत्रानें तुलसी, बेल वा दूर्वा घेऊन आपले अंगावर व सर्वत्र प्रोक्षण करावें, म्हणजे स्वत:ची व पदार्थादिकांची शुद्धि होते. याप्रमाणें पूर्वांग झाल्यावर मुख्य देवतेच्या पूजेकडे वळावें. भागवतामध्यें ‘शैली दारुमयी’ या श्चोकानें प्रतिमा आठ प्रकारची सांगितली आहे. ज्या मूर्तीकडे पाहिलें असतां मन स्थिर व सुप्रसन्न होईल, असें मूर्तिसौंदर्य असावें. चित्त तल्लीन झाल्यानेंच त्या मूर्तीचे ठिकाणीं देवत्व प्रकट होतें. ‘अर्चकस्य तपोयोगादर्चनस्यातिशायनात् । आभिरूप्याच्च बिंबानां देव: सानिध्यमृच्छति ॥’ इति ॥ पूजकाचें तपोबल, शुद्धाचरण, श्रद्धापूर्वक पूजन व प्रतिमेचें सौंदर्य यानेंच देवता सन्निध होते. प्रतिमा भंगादिदोषयुक्त असूं नये. अशा प्रकारच्या मूर्तीचें आवाहनादि उपचारांनीं पूजन करावें. शवत्यशक्त्यनुसार उपचारांविषयीं अनेक पक्ष आहेत. एका उपचारापासून शायशीं उपचारापर्यंत पूजाकल्प वाढविला आहे. ग्रंथविस्तारभयास्तव तो येथें देत नाहीं.
ध्यान -
म्हणजे उपास्य देवतेचें स्वरूप हृत्कमलांत पाहणें, व त्याचेंच चिंतन करणें, याज्ञवल्क्य म्हणतो - हृदयांत असलेल्या इष्टदेवतेचें एकाग्रचित्तानें जें चिंतन, त्याला ध्यान म्हणतात. अशा प्रकारची ध्यानधारणा सामान्य माणसाची होत नसल्यानें देवतास्ववर्णनपर मंत्र वा श्लोक म्हणून वाचिक ध्यान करण्याचा सध्यां शिष्टसंप्रदाय आहे. त्यांतही घ्यानश्लोक विधिवाक्यबोधक वाक्यापेक्षां स्वकर्तृक देवताकर्मक अशा अर्थाचे श्लोक म्हणणें योग्य. जसें - ‘वंदे विष्णुं’, मी विष्णूला वंदन करतों. ‘बंदे रामं’, मी रामाचें ध्यान करतों. ‘दुर्गां भजे’, मी दुर्गादेवीला भजतों, या अर्थाचे श्लोक म्हणणें चांगलें.