तृतीय पटल - उग्रासनकथनम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
आपले दोन्ही पाय एकमेकाला जुळवून लांब करावेत व दोन्ही हातांनी ( पायांचे अंगठे ) दृढतापूर्वक धरून गुडघ्यावर डोके टेकावे. ( डोके गुडघ्याला लावताना हाताचे कोपरे जमिनीला टेकविल्यास उत्तम. ) या आसनाला उग्रासन म्हणतात. यामुळे वायूचे दीपन म्हणजे वायू चेतन होतो. अर्थात् त्यामुळे आळस व अस्वस्थता दूर होऊन शरीर निरोगी राहते व मृत्यूचाही नाश होतो. हे आसन सर्व आसनांमध्ये श्रेष्ठ आहे. बुद्धिमान् साधकाने नित्य हे आसन घालून साधन केले; तर वायू पश्चिममार्गाने अर्थात् सुषुम्नामार्गाने निश्चितपणे संचार करील.
अशा प्रकारे निरंतर अभ्यास करीत राहणार्या साधकाला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. या करिता आत्म्याची सिद्धी म्हणजे आत्मप्राप्ती होण्यासाठी सतत साधना करीत राहणे हे साधक योग्याचे कर्तव्य आहे.
हे आसन अत्यंत प्रयत्नाने गुप्त ठेवावे. ते कोणालाही व सरसकट सर्वांना देणे अर्थात् शिकविणे उचित नाही अर्थात् अधिकारी साधकालाच देणे योग्य आहे. या आसनामुळे अत्यंत शीघ्रतेने वायू सिद्ध म्हणजे वश होतो अर्थात् त्याची वक्रता नाहीशी होऊन तो सरळ व सुषुम्नागामी होतो. त्याचप्रमाणे या आसनाच्या द्वारा सर्व दु:खांच्या ओघाचा, प्रवाहाचा किंवा समूहाचा नाश होतो.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP