अंक दुसरा - प्रवेश पहिला
गोविंद.बल्ल्लाळ.देवल,drama,govind.ballal.deval,marathi,mrucchakatik,नाटक,मृच्छ्कटिक,मराठी,साहित्य,
( द्युतकार संवाहक घाबर्या घाबर्या येतो. )
संवाहक : आतां काय करावें ? हे दुष्ट द्युतकार माझे प्राण घेतात कीं काय कोण जाणें ! आतां लपावे तरी कोठें ? महाराज , आपल्या घरांत तरी जागा द्या. ( ऐकलेसे करुन ) काय म्हणतां मी चोर आहें ? नाही - नाहीं , गरीब मनुष्य आहे. नाही ऐकत ? आतां कोठे जावें ? ( पडद्याकडे पाहून ) अरेरे ! हा दुष्ट द्युतकार आलां ! आतां काय करावें ? छे ! आतां येथे थांबून उपयोग नाही. ( धडपडत जातो. )
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP