प्रस्तावना
दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
या ग्रंथाची एकच प्रत रा. रा. श्रीधर अवधूत देशपांडे यांचे होती. तिजवरून पुढील ग्रंथ छापला आहे. ही प्रत जुन्या खर्ची कागदाच्या ११ इंच लांब व ६ १/२ इंच रुंद अशा उभ्या वहीवर लिहीलेली आहे. हिची ४९ पृष्ठें असून शेवटल्या पृष्ठाची जागा व त्यापुढें वही कोरी आहे, यावरून ज्या प्रतीवरून ही प्रत केली, तीही मुळांत त्रुटितच असण्याचा संभव आहे. प्रतीवर प्रत कोणीं केव्हां केली, हें समजण्यास कांहीं एक साधन नाहीं. प्रतीचें अक्षर अगदीं अलीकडचें दिसतें.
वर सांगितलेले श्रीधरपंत देशपांडे हे या चरित्रनायकाचे वंशज होत. दासोपंतांपासून हे १२ वे पुरुष. दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत. श्रीधरपंतांनीं हें चरित्र छ्पाईकर्त्यास दिलें. छापलेलें दासोपंतांचें चरित्र श्रीधरस्वामी नाझरेकर यांनीं रचलें असें म्हणणें आहे. परंतु या चरित्राच्या भाषेवरून, रचनेवरून व इतर अंतःप्रमाणांवरून हें श्रीधरस्वामींनीं रचलेलें नसून त्यांचेनंतर बरेच वर्षांनीं रचलें गेलें आहे, असें उघड दिसतें.
हा चरित्रग्रंथ लिहिणारानें आपलें कुलदैवत मार्तंड असें दिलें आहे ( ओं. ५ पहा ). श्रीधरस्वामींचें कुलदैवत विठ्ठल आहे, मार्तंड नव्हे.
या चरित्राचा लेखक कोण हें कळत नसल्यामुळें त्याचेसंबंधीं कोणतीही माहिती देतां येत नाहीं. मात्र इतकें खरें कीं या चरित्राचा लेखक अगदीं साधारण प्रतीचा कवि असून अलीकडला असावा.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP