दासोपंत चरित्र - पदे ६२६ ते ६५०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


कित्येक उल्लंघून तिन्ही मंदिर । प्रवेशूनि चौथें मंदिर । तेथे पाहतां श्रीदिगंबर । पाहणे दिगंबरी प्रवेशती ॥२६॥ दिगंबरी प्रवेशून पाहणे । पाहण्याचेही ग्रास करुन । पाहणेच होऊन परिपूर्ण । यापरी कित्येक पै रमती ॥२७॥ कित्येक भक्त कर्माकर्म । त्यांचे करुन भस्म । तें चर्चूनि सर्वागी सप्रेम । अंगेविण विराजती ॥२८॥ कित्येक विषयवर्ज उपोषण । कित्येक स्वस्वरुपी पारण । कित्येक सर्वा भूती सद्भाव मन । हे फल भक्षण पै करिती ॥२९॥ यापरीचे भक्त अनेका वसती तया पर्वती देख । तेथील वृक्षपाषाणादिक । मूर्तिमंत सुख जाणावे ॥३०॥ द्रोणाद्रिपर्वती संजीविनी । ते दुर्लभ की सर्वांलागूनि । सह्याद्रिसंजीविनी दंडपाणी । अजरामर करी ध्यानमृते ॥३१॥ तें ध्यानन्मृत ज्यासि मिळे । कळिकाळ त्याचे पायी लोळे । ब्रह्म होऊन तो खेळे । जन्म मरण त्या कैचे ॥३२॥ जन्ममरणावर्ती । कैचें राहे त्या पर्वती । तेथ राहतां निश्चिती । अमर काया होतसें ॥३३॥ यास्तव कित्येक मुनेश्वर । आणि कित्येक योगेश्वर । रमती अखंड निर्धार । तये पर्वती स्वच्छंदे ॥३४॥ ते पर्वत केवळ चिद्विलास । ते पर्वत केवळ प्रत्यक्ष कैलास । तेथे राहतां अनायास । दिगंबर भेटे अविलंब ॥३५॥ त्या पर्वतातळी देवदेवक्षेत्र । सर्व तीर्थ असे पवित्र । सर्व तीर्थ वसती अहोरात्र । यास्तव सर्वतीर्थ त्या नांव ॥३६॥ असो महाराज दासोपंत । श्रीदिगंबर ज्यांचे वेळाहत । सर्वतीर्थी स्नान निश्चित । करुनि कुळदैवत पूजिले ॥३७॥ कुलचि नसे ज्यासि । तो कुलदैवत कैसा जनांसि । परी तो कुलदैवत असे त्यासि । त्याविण जो कांहीच नेणे ॥३८॥ सर्वा भूती त्यासच पाहे । अवस्थात्रयी त्यासच ध्याये । त्याविण क्षणैक न राहे । तो त्याचा सहज कुलस्वामी ॥३९॥ कुलस्वामीस करुन पूजा । ग्रासूनि संपूर्ण भाव दूजा । ह्रदयी आठवूनि योगिराजा । सहज चढले पर्वता ॥४०॥ पर्वती चढतां चित्तवृत्ति । समूळ रंगली अवधूती । कांहीच न राहे देहभ्रांति । मी कोण ? कोठे पै आलो ? ॥४१॥ यांस पाहतां तेथील लोक । बोलते झाले एकमेक । हे कोण असे बाळ निष्कलंक । चंद्रवत शोभते मुख याचे ॥४२॥ वय पाहतां दिसे वर्षद्वादश । द्वादशांकी परी तेज विशेष । काय अवधूतचि प्रकटले मानवी वेष । आह्मां लोकां तारावया ॥४३॥ कोणी ह्मणती " हा बाळ दिगंबर " । कोणी ह्मणती " हा सर्वेश्वर " । कोणी ह्मणती " कोणाचा किशोर । मार्ग चुकोनि आलासे " ॥४४॥ कित्येक यांस पाहतां विसरले ध्यान । कित्येक वर्जून आपुले मौन । त्यांसि करिती संभाषण । कोठील कोण तूं ? असे ॥४५॥ " काय चुकूनि आलास रे मार्ग ? । हे संपूर्ण आह्मांस सांग । तुज पाहतां सर्वागे । आनंदलहरी उठतसे ॥४६॥ तूं काय राजपुत्र ? । किंवा ब्राह्मण पवित्र ? ॥ तुज पाहतां विचित्र । आह्मांसि आतां पै भासती ॥४७॥ तूं तरी दिसशी अति मनोहर । केविं आलास या वनांतर ॥ हे तरी स्थान यति दिगंबर । वास करुन राहायाचे ॥४८॥ तुझें शरीर तो अति सुकुमार । केविं सोसेल उष्ण वार ? । तुजला अन्नादि उपचार । होईल कैसे या स्थळी ॥४९॥ तुज ऐसा सोडून पुत्र । तुमचे माता पिता निश्चित । केविं राहिले असतील घरांत ? । काय कार्यास्तव आलासि ? ॥६५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP