दासोपंत चरित्र - पदे ४२६ ते ४५०
दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
पतीस माने सद्गुरु । पतिआज्ञेस तत्परु । पतिमनोगतानुसार । आपण चाले स्वानंद ॥२६॥ स्त्रियेचे सर्व अनुष्ठान । चाले पतिआज्ञेप्रमाणे । ती धन्य त्रिभुवनी पूर्ण । तिचे स्मरणे लोक तरती ॥२७॥ पुत्र पूजावा मातापिता । कुलस्त्री पूजावी पतीस तत्वतां । गृहस्थ पूजावा अतीतअभ्यागता । यापरी आगमी नीति असे ॥२८॥ आगमार्थ ऐकोनि श्रवणी । अनुसूया रतली पतिचरणी । ख्याती झाली त्रिभुवनी । ब्रह्मादिक पै स्वविती ॥२९॥ पतिसेवा हेंच तपाजीस चालिलेसे एकरुप । नित्य नवा प्रेमा अमुप । चढत जाती आनंद ॥३०॥ असो तिचे तप पाहून । दर्शन इच्छिती सुरजन । आणि स्तविती हालविती तर्जन । धन्य पतिव्रता ह्मणूनि ॥३१॥ एकदां महाराज देवर्पि । ज्ञानसंपन्न तेजोराशि । ज्ञानसंपन्न तेजोराशि । त्रिभुवनी गमन ज्यांसी । नाम ज्यांचे नारदमुनि ॥३२॥ हाती वीणा, मुखी नारायणहरी नाम । गर्जना करीतसे संभ्रम । पाहून अनुसूयाचे तपोत्तम । पातले भूतळी ते मुनी ॥३३॥ तिचे पाहतां पतिव्रताधर्म । मुनीस येतसे अत्यंत प्रेम । सद्भावे स्तवून वंदून अतिसंभ्रम । गमन करीतसे सत्यलोका ॥३४॥ सत्यलोकी सावित्रीप्रती । मुनी वर्णितसे तिची ख्याती । धन्य ह्मणावें अनुसूया सती । पतिव्रतांमाज अग्रणी ॥३५॥ तिजसमान या त्रिभुवनी । दृष्टीस न पडे मजलागुनी । तूं चतुराननाची राणी । परी तिजसमान मी न ह्मणूं ॥३६॥ ऐसी अनेकपरी । तीसि मुनी वर्णी निर्धारी । लज्जित होऊन सावित्री । पतीस आपुल्या विनवीतसे ॥३७॥ याचपरी वैकुंठकैलासी । मुनी सांगे रमाउमांसि । त्याही लज्जित होऊन मानसी । हरिहारांसि पै विनविती ॥३८॥ अनुसूयेचे सेवातप । तें जाणोनि फलद्रूप । काय करिते झाले चिद्रूप । ब्रह्माहरिश्रीशंकर ॥३९॥ अतिथीचें धरुन वेष । त्रिवर्ग पातले अत्रिआश्रमास । तेव्हां मुनी गेला असे तपास । गृही राहे अनुसूया ॥४०॥ अगाध ते अनुसूया जननी । हरिहारादिक पावले तिजलागुनी । तिचे तपे तोषून अंत:करणी । वर द्यावया मूर्तिमंत ॥४१॥ तिघेही होऊनि ब्राह्मण । प्रवेशले आश्रयामाजि जाण । मुखी बोलतसे वचन । अभ्यागत पातलों भोजनास्तव ॥४२॥ हे शब्द पडतां कानी । बाहिर आली अनुसूया जननी । सप्रेम वंदून त्यांलागुनी । बोले काये अति हर्षे ॥४३॥ आपण मंदिरी चलाव । घरधणी गेले तपास्तव । आपण साक्षात देवाधिदेव । कृपा करुन मजवरी ॥४४॥ स्वयंपाक होईजेपर्यंत । पतिही येतात निश्चित । आपण बसावें सावधचित्त । नावेक आतां या काळी ॥४५॥ ते तिघे आल परीक्षास्तव । तिचे काय तपवैभव । तेणे आले स्वभाव । बोले काय तियेसि ॥४६॥ आह्मी तो केवळ क्षुधाक्रांत । प्राण आमुचे निघूं पाहत । यास्तव अन्न त्वरित । देऊन तृप्त तू करी ॥४७॥ अतिथी केवळ स्वयंविष्णु । अतिथि प्रत्यक्ष उभारमणु । अतिथिच असे चतुराननु । हे तरी प्रसिध्द वेदशास्त्री ॥४८॥ संपूर्ण निगामागमार्थ । तुमचे पतीचे मुखोद्गत । तुह्मां असतां अवगत । विलंब कांही साहवेना ॥४९॥ आह्मा अन्न देतां तुमचे पति । अन्न द्यावें आह्मांसि ॥४५०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP