मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत श्रीरघुनाथ चरित्र| ओव्या १०१ ते १५० निरंजन स्वामीकृत श्रीरघुनाथ चरित्र ओव्या १ ते ५० ओव्या ५१ ते १०० ओव्या १०१ ते १५० ओव्या १५१ ते २०० ओव्या २०१ ते २५० ओव्या २५१ ते ३०० ओव्या ३०१ ते ३५० ओव्या ३५१ ते ३९६ श्रीरघुनाथ चरित्र - ओव्या १०१ ते १५० वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी ओव्या १०१ ते १५० Translation - भाषांतर असो भृगु आणि मृडानीवर । करोनी ऐसा विचार । द्विजपत्नी आणि द्विजवर । मातापितरें नेमिलीं ॥१०१॥कर्नाटक देशामाझारीं । मल्लप्रहरेचिये तीरीं । अशोक क्षेत्रामाझारी । जन्म घेतला द्विजवरें ॥१०२॥विश्वनाथभट अळवणीकर । तयाची पत्नी गरोदर । तियेचे उदरीं ते विप्र । जन्मालागीं पै आला ॥१०३॥तयाचे जन्म तिये दिनीं । मल्लप्रभेचे जीवनीं ॥ भागीरथी स्वयें येऊनी । रहाती जाली दिनत्रय ॥१०४॥प्रति वर्षीं ते दिनीं यावें । ती साक्ष अद्यापी आहे । भागीरथीचें पुण्य लाहे । स्नान करितां ते स्थळीं ॥१०५॥लेकुरा जाले त्रयोदशदिन । ते दिवशीचें रात्रीं जाण । तयाचे तीर्थरूपालागून । स्वप्न होतें जहालें ॥१०६॥रात्रीं येवोनि गजवदन । बोलते जाले स्पष्ट वचन । जाहला जो कां तव नंदन । तपस्वी पूर्ण आहे तो ॥१०७॥तरि तुह्मी इतुकें करावें । माझें नाम यातें ठेवावें । गणपति ह्मणोनि बरवें । पाचारावें सर्वदा ॥१०८॥याचे उदरीं तिघेजण । अवतार घेतील सामर्थ्यवान । भृगुऋषी आणि पंचवदन । तिसरी जाण पार्वती ॥१०९॥त्रिवर्ग एथें प्रगटून । करितील जगाचें उद्धरण । तारि तुह्मांतें हेंचि सांगणें । असे माझें निश्चित ॥११०॥याजप्रती अहर्निशी । सांभाळावें जिवीं मानसीं । ऐसें सांगोनिया निशीं । वक्रतुंड पै गेला ॥१११॥सूर्योदय झालियावरी । विश्वनाथ भटजींनीं सत्वरीं । जावोनि गृहामाझारी । कांतेप्रती कथियेलें ॥११२॥उत्साह करोनि अति प्रीतीं । मेळविल्या बहुत युवती । नाम ठेविलें गणपती । जो जो शब्दें करोनी ॥११३॥तयाचें लालनपालन करितां । अष्टवर्षें झालीं तत्वता । व्रतबंध करोनिया चिंता । विवाहाची लागली ॥११४॥असो तया क्षेत्रामाझारी । काशीनाथ भटजी श्रोत्री । तयालागी जाली पुत्री । चिमाबाई या नामें ॥११५॥तया श्रोत्रीयाचे स्वप्नीं । जाता झाला अंकुशपाणी । वदोनिया मधुर वाणी । तयाप्रती सांगत ॥११६॥विश्वनाथ भट अलावणी चतुर । गणपती नामें तयाचा कुमर । तयासी तुमची कुमार । सत्वर नेवोनि देईजे ॥११७॥पूर्वीं या उभयतांचा जोडा । शंकरें नेमिला असे फुडा । करोनिया जिवाचा धडा । नर्मदेमाजी हे गेलीं ॥११८॥तेचि हे दों ठायीं जन्मून । वधुवरें शोभतील जाण । यांचे उदरीं उवतार होऊन । उद्धार होईल जगाचा ॥११९॥ऐसें दाखवोनिया स्वप्न । जाता झाला गजवदन । तेचि समई श्रोत्री उठून । विचार करिते जहाले ॥१२०॥कांतेप्रती बोलावून । सांगते झाले वर्तमान । स्वप्नीं येवोनि गजवदन । बोलिला होता ज्या रीतीं ॥१२१॥उदयासी पावतां दिनकर । उभयतांनीं करूनि विचार । विश्वानाथ भटजीसी कर । जोडोनि विनंती करीतसे ॥१२२॥दीन जाणोनि सर्वापरी । तुम्ही आह्मांसी घ्यावें पदरीं । चिमा आमुची कुमारी । तुमचे पुत्रा देतसों ॥१२३॥ऐसें वचन बोलतां वहिलें । विश्वनाथ भटजीस मानलें । मुहूर्त पाहूनि निश्चय केले । उभयतांनीं तेधवा ॥१२४॥यथासांग लग्न सोहळा । चार दिवस अति सोज्वळा । बहुत संभ्रमें तये वेळा । करिते जाले दोघेही ॥१२५॥असो लग्न जालियावरी । चमत्कार जाला ते अवसरीं । सावध होऊनिया चतुरीं । श्रवण केलें पाहिजे ॥१२६॥गणपती धाकुटे वय असून । त्रिकाल स्नान संध्या सारून । करित असावें शिव - पूजन । यथाविधी करूनी ॥१२७॥शिवरात्र्यादि सोमवार । एकादश्यादी व्रतें समग्र । करोनिया पूजा उपचार । निराहारी असावें ॥१२८॥तंवं माघ वद्य एकादशी । सोमवासर तये दिवशीं । येते जाले अनायासीं । पर्वकाळ सर्वही ॥१२९॥माध्यान्हीं पातला दिनकर । भूमिका तापली समग्र । नंव स्नानासी विश्वनाथभटापुत्र । जाता जाला त्वरेनें ॥१३०॥मल्लप्रहरे माझारी । स्नाना लागी अती सत्वरीं । जावोनिया डोहा माझारीं । बुडी दिधली तयानें ॥१३१॥तये स्थानीं जळ देवता । क्रीडा करावयासी तत्वता । पातल्या होत्या समस्ता । तया डोहा माझारीं ॥१३२॥त्यांनीं पाहुनी तो किशोर । रूप लावण्य अति सुंदर । त्यासी घेऊनी अति सत्वर । जात्या जाल्या जळांत ॥१३३॥नेवोनिया आपुलें सदनीं । ठेवित्या जाल्या त्यागोनि । तंव मल्लप्रभेचे जीवनीं । स्नानासी लोक पातले ॥१३४॥ते म्हणती हा किशोर । बुडोनि जाला बहु उशीर । शोध करावा सत्वर । अझूनि वरुता कां नये ॥१३५॥पहाती जळांत शोधुनी । तंव तो न पडेची ठिकाणीं । सर्वत्रीं जावोनि ते क्षणीं । ग्रामा माजी कथियेलें ॥१३६॥पाहोनि तयाची मातापितरां । सांगते झाले समग्र । गणपती तूमचा कुमार । जळामाजी बुडला ॥१३७॥ऐकुनि ऐसें वर्तमान । उभयतां शोकार्णवीं निमग्न । धरणीवरी शरीर टाकून । रुदन करिती आक्रोशें ॥१३८॥नदीतटाका जाऊनी । हाक मारिती दीनवाणी । रे रे गणपती आम्हालागुनि । टाकुनि कैसा गेलासी ॥१३९॥आम्हां आंधळियांची काठी । नेवोनि टाकिली गिरीकपाटीं । काय आमुचिये ललाटीं । विधातियानें लिहीलें ॥१४०॥रे रे शिवसांब कर्पूरगौरा । हे कैलास पति मृडानीवरा । हे सर्पभूषण चंद्रशेखरा । दीनोद्धारा धांवे हो ॥१४१॥स्वप्नी येवोनि गजवदन । सांगोनि गेला वर्तमान । जयाचे उदराप्रती जाण । पंचवदन येईल पैं ॥१४२॥भृगुऋषी आणि पार्वती । येतिल याचे उदराप्रती । ते कांहींच न येतां प्रतीती । अनृत कैसें जहालें ॥१४३॥आतां धावरे मृडानीवरा । दाखवि आमुचिये पुत्रा । नाहीं तरि यया अवसारा । देह आम्ही त्यागितों ॥१४४॥ऐसें वदोनि मातापितर । जाले देहावरि उदार । तों इतुकियामाजी चमत्कार । होता जाला ते थळीं ॥१४५॥अनेक शोकें अनुवादितां । तीन दिवस गेले तत्वता । तों शिवरात्री दिन येतां । जाला तये अवसरीं ॥१४६॥करुणा परिसोनि सत्वरीं । शिव जाहला साहकारी । धावण्या धावोनि सत्वरीं । भक्तकैवारी पावला ॥१४७॥जळदेवतांसी दंडून । सोडविला द्विजनंदन । स्वहस्तीं धरुनि आपण । वरुते घवोनि त्या आले ॥१४८॥उभयतांनीं पुत्र पाहिला । मग बहुतचि आनंद झाला । म्हणे कैवारी धावला । मृडानीवर ये काळीं ॥१४९॥जैसा अवर्षणीं पर्जन्य पडे । की मरतीयासी अमृत जोडे । कें दरिद्रियासी सापडे । द्रव्यकुंभ ज्या रीती ॥१५०॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP