निरंजन स्वामीकृत पाळणे - दत्ताचा पाळणा

लहान मुलाला झोपविण्यासाठी आई जे गीत म्हणते, तोच पाळणा.


जो जो जो जो रे मुनिवर्या । स्वामी दत्तात्रया ॥
सांगुनि पूर्वीचा निजपर्या । हालविती अनुसूया ॥धृ॥
असतां निजसदनीं अत्रिमुनी । मागितलें मज पाणी ।
मुसळ थांबविलें तेचि क्षणीं । ऐकुनि मुनिची वाणी ॥१॥
नारद मुनिनें तें पाहुनि । सांगितलें सुरसदनीं ।
हरि - हर - ब्रह्मांच्या त्रैपत्नी । क्षोभविल्या अभिमानी ॥२॥
त्यांनीं आपुलाले दाटुले । छळणासी धाडिले ।
त्यांहीं अडवुनिया मज वहिले । भिक्षेसी भागितले ॥३॥
मग म्यां तीर्थातें शिंपिले । तिन्ही बाळे केले ।
भोजन घालुनिया निजवीले । संवत्सर बहु गेल ॥४॥
उमा सावित्री लक्षूमी । आल्या आमुच्या धामीं ।
त्यांनीं मागितले निजस्वामी । सांडुनि आपुली मी मी ॥५॥
मग म्यां दाखविले देवत्रय । तो तूं दत्तात्रय ।
निरंजनासि आश्रय । सखया तुझा होय ॥६॥ जो जो ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP