निरंजन स्वामीकृत पाळणे - पाळणा विष्णूचा
लहान मुलाला झोपविण्यासाठी आई जे गीत म्हणते, तोच पाळणा.
जो जो जो जो रे गोविंदा चिमण्या बाळ मुकुंदा ।
सांडुनि सृष्टीचा श्रमधंदा निजनिज आनंदा ॥धृ॥
अपुल्या मायेच्या योगानें त्रिगुणात्मक होऊन ।
करिसि उत्पत्तिपाळण विश्वसंहारण ॥१॥
अनुग्रह करिसि भक्तासी निग्रह अभक्तासी ।
सेवुनि ऋषिच्या शापासी दव अवतारा येसी ॥२॥
मच्छकच्छ तूं सूकर होउनि सिंहाकार ।
वामन चिमणासा सुंदर होसी फरशधर ॥३॥
रामश्रीकृष्ण होउन राहसी बौद्धपणें ।
कलंकिरूप घेउन करिसि विश्वहानन ॥४॥
प्रबयांबू ठाइं पवित्र लहानसें वटपत्र ।
पालख टांगियला विचित्र नाहीं दोरसूत्र ॥५॥
निरंजनवासी श्रीधर निजुनी पत्रावर ।
निजपद अंगुष्ठ सकुमार चोखी वारंवार ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 29, 2018
TOP