निरंजन स्वामीकृत स्फुट आर्या

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


आर्या १.

सावध होइ मनारे नाहीं सुख या कदापि संसारीं ।
आठवितां कंसारी तरि मग सुख या उदंड संसारीं ।

आर्या २.

धन्य ह्मणावे तेचि ज्यांनीं स्वरुपींच वृत्ति वाढविली ।
विषयगजाचें शुंडेपासुनि वृत्ती हळूंच सोडविली ॥१॥

निरंजन स्वामीकृत दोहरे.

दोहरा १
निरंजन मन मारा नहि छोडदिया घरदार ।
फीर फीर घर कुल्याय गामन मतंग अनिवार ॥१॥

निरंजन स्वामीकृत श्लोक.

स्फुट श्लोक. १.

ऐका ब्रह्म कसें अखंड विलसे चिद्रूप तें फारसें ।
त्याचा पार नसे अनावरपणें स्वातंत्र्य तेणें वसे ॥
विश्वामाजि असे परंतु न दिसे धुंडाळिल्या डोळसे ।
रघुनाथासि पुसे निरंजनिं वसे तेव्हांचि तें गीवसे ॥१॥

स्फुट श्लोक २.

नाशिकपंचवटीं बहूत निकटीं गोदावरीचे तटीं ।
नांदे श्रीरघुनाथमूर्ति बरवी पाहूं चला हो दिठीं ।
ज्याचे पादपदांबुजासि नमितां जीवासि हाती सुटी ।
ब्रह्मानंदसुखासि पावुनि हरे भवताप ऊठाउठी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP