मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|श्रीगुरुबोध ग्रंथ| तृतीय प्रकरण श्रीगुरुबोध ग्रंथ ग्रंथानुक्रमणिका प्रथम प्रकरण द्वितीय प्रकरण तृतीय प्रकरण चतुर्थ प्रकरण पंचम प्रकरण षष्ठ प्रकरण सप्तम प्रकरण अष्टम प्रकरण नवम प्रकरण श्रीगुरुबोध ग्रंथ - तृतीय प्रकरण श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज. Tags : abhangbandkarpadअभंगपदबांदकर तृतीय प्रकरणं प्रारंभः Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशायनमः ॥मज समोर बैसविलें । गुरुरायें बोलों आरंभिलें । ह्मणती तुज कोणीं गांजिलें । सांग मज ॥१॥संसारें त्रासलों ह्मणसी । तरी तूं त्याचा द्रष्टा आहेसि । असंगत्वें पाहसी । तरी तूं निराळा ॥२॥तूं तुझें स्वरूप विसरलासी । ह्मणोनि संसारीं भुललासी । आतां तरी दृश्य भासासी । टाकूनि देईं ॥३॥तुझ्यापुढें जें जें दिसे । तें तें सर्वहि नासे । तुझा तूं असतचि असे । सर्वकाळ ॥४॥जन्ममरण तुला नाहीं । अवस्थात्रयाचा साक्षी पाहीं । सच्चिदानंद लक्षणीं तिहीं । ओळखी घे तूं ॥५॥तूं नामरूपातीत अससी । दृश्य पदार्था नातळसी । तुझा तूंचि अससी । वेगळेंपणें ॥६॥कैंचा पुत्र कैंची जाया । सुखासाठीं ह्मणती या या । माझी माझी ह्मण़सी काया । ती तूं नव्हेसी सर्वथा ॥७॥मुखें माझें जें ह्मणसी । तें तूं कैसेनि होसी । त्याहूनि निराळा अससी । ह्मणूनि म्हणसी माझें ॥८॥तिन्ही अवस्थांचा साक्षी । बरवें आपणातें लक्षी । खोटें अहंपण भक्षीं । सुखिया होसी ॥९॥नाम रूप तुला नाहीं । ऐसें सांगितलें पाहीं । तें स्पष्ट सांगतों हृदयीं । दृढ धरूं ॥१०॥ज्यावेळीं तुझें जन्म झालें । आईबापें नाम ठेविलें । तेंचि सत्य मनीं कल्पिलें । माझें ऐसें ॥११॥दुसर्यासि हाक मारितां । तूं ओ न देसी तत्वतां । तुझें नाम उच्चारितां । पुढें होसी ॥१२॥सत्य नाम एकचि धरिलें । तरी तेंही मिथ्या ठरलें । कैसें तेंही वहिलें । सांगतों तुज ॥१३॥बाप मुला म्हणोनि पाचारी । मुलें दादा म्हणती निर्धारीं । चाकर साहेब म्हणोनि पुढारीं । सांगाया येती ॥१४॥इतुक्यां ओ देसी स्वभावें । मग कैचें नाम खरें मानावें । हेंचि मजसी सांगावें । निश्चय करूनि ॥१५॥मूल हेंचि नाम सत्य मानिसी । तरी बाबा म्हणतां ओ कां देसी । बाबा हेंचि सत्य धरिसी । तरी दादा म्हणतां सरसी पुढें ॥१६॥विचारें तुला नामचि नाहीं । म्हणूनि कोणत्याही नामें पाहीं । पाचारितां विषाद कांहीं । वाटेचिना ॥१७॥इति श्रीगुरुबोध ग्रंथ । श्रवणें लाभे मोक्षपंथ । मननाभ्यासें श्रीभगवंत । हृदयीं भेटे ॥१८॥इति श्रीगुरुबोधे तृतीय प्रकरणं संपूर्णम् ॥३॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP