मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरणादी अभंग| ११ ते १५ पंचीकरणादी अभंग १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५२ पंचीकरणादी अभंग - ११ ते १५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ पंचीकरणादी अभंग - ११ ते १५ Translation - भाषांतर ११साधुसंगें साधु भोंदुसंगें भोंदु । वादुसंगें वादु होत असे ॥१॥होत असे लाभ भल्याचे संगतीं । जाय अधोगती दुष्टसंगें ॥२॥दुष्टसंगें नष्ट जाला महापापी । होतसे निःपापी साधुसंगें ॥३॥संग जया जैसा लाभ तया तैसा । होतसे आपैसा अनायासें ॥४॥अनायासें गति चुके अधोगती । धरितां संगती सज्जनाची ॥५॥सज्जनाची कृपा जयालागीं होय । तयालागीं सोय परत्रींची ॥६॥परत्रींची सोय भक्तिचे उपायें । चुकती अपाये दास म्हणे ॥७॥१२दुर्जनाचे संगें होय मनोभंग । सज्जनाचा योग सुख करी ॥१॥सुख करी संग संत सज्जनाचा । संताप मनाचा दुरीं ठाके ॥२॥दुरी ठाकें दुःख होय सर्व सुख । पाहों जातां शोक आढळेना ॥३॥आढळेना लाभ तेथें कैंचा क्षोम । अलभ्याचा लाभ संतसंगें ॥४॥संतसंगें सुख रामीरामदासीं । देहसंबंधासी उरी नाहीं ॥५॥१३साधु आणि भक्त व्युत्पन्न विरक्त । तपोनिधि शांत अपूर्व तो ॥१॥अपूर्व तो जनीं शुद्ध समाधानी । जनाचे मिळणी मिळूं जाणे ॥२॥मिळों जाय जना निर्मळ वासना । अंतरीं असेना निंदाद्वेष ॥३॥निंदा द्वेष नसे मनीं लय असे । तेथें कृपा वसे सर्वकाळ ॥४॥सर्वकाळ जेणें सार्थकीं लाविला । वंश उद्धरिला नामघोषें ॥५॥नामघोष वाचे उच्चारी सर्वदा । संताच्या संवादा वाटेकरी ॥६॥वाटेकरी जाला सायुज्यमुक्तीचा । धन्य तो दैवाचा दास म्हणे ॥७॥१४ऐसा कोण संत जो दावी अनंत । संदेहाचा घात करूं जाणे ॥१॥करूं जाणे साधकांचें समाधान । जया भिन्नाभिन्न आढळेना ॥२॥आढळेना जया आपुलें पारिखें । ऐक्यरूपें सुखें सुखावले ॥३॥सुखावला ज्याचे संगती साधक । साधु तोचि एक धन्य जगीं ॥४॥धन्य तेचि जगीं जे गुण बोलिले । दास म्हणे जाले पुरूष तेचि ॥५॥१५संतांचेनि संगें देव पाठी लागे । सांडऊं जातां मागें सांडवेना ॥१॥सांडवेना सदा देव समागमीं । बाह्य अंतर्यामीं सारिखाचि ॥२॥सारिखाचि कडे कपाट शिखरीं । गृहीं वनांतरीं सारिखाचि ॥३॥सारिखाचि तीर्थीं सारिखाचि क्षेत्रीं । दिवस आणि रात्रीं सारिखाचि ॥४॥सारिखाचि अंत नाहीं तो अनंत । रामदासांकित मावळला ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP