रज: सत्वं तमश्वैव शुद्धसत्वं चतुर्थकम् ॥
निर्गुणं सगुणातीतं पंचमं सुप्रतिष्ठितम् ॥११॥
रज,सत्व, तम शुद्धसत्व आणि अत्यंत प्रतिष्ठित असा पांचवा निर्गुण असे गुणांचे पांच प्रकार आहेत ॥११॥
रक्तं श्वेतं तथा श्यामं नीलं सुनीलपंकजम् ॥
पंचमं शुद्ध्पीतं च तस्यांते श्वेतमुज्ज्वलम् ॥१२॥
रक्त, श्वेत, श्याम, निळ्या कमळाप्रमाणे नील आणि शुद्धपति असे पांच वर्ण आहेत ॥१२॥
पृथिव्यापस्तथा तेजो वायुराकाशमेव च ॥
पंच भूतानि कल्प्यंते पंच भूता: सुनिश्विता: ॥१३॥
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशा ह्या पं भूतांचे कल्पना केलेली असून ती शाश्वत आहे ॥१३॥
सर्जनं पालनं चैव प्रलयश्च तृतीयक: ॥
सूर्यक्रिया क्रिया: पंचकसंज्ञिता: ॥१४॥
सर्जन, मार्जन, प्रलय, सूर्यक्रिया आणि चंद्रक्रिया अशा पांच क्रिया आहेत ॥१४॥
पूर्वेंद्र: पश्चिमदिशा वरुण: प्रसिद्धो धर्मश्च दक्षिणोत्तर दिक् कुबेर: ॥
ऊर्ध्वा हि पद्यजननो जगतो विधाता एवं दिशोथ पतिदैवतपंचकं च ॥१५॥
पूर्वेस इंद्र, पश्चिमेस वरूण, दक्षिणेस यम,उत्तरेस कुबेर आणि उर्ध्व दिशेस जगाला उत्पन्न करणारा विधाता असे हे
पांच दिशांचे पाच देव स्वामी आहेत ॥१५॥
नैॠत्यकात्येणं निॠतीश्वर्मीशकीणमाग्नेयकोणम धिदैवतमग्निदे: ॥
वायव्यकोणमधिदैवतवायुदेवश्चधोदिशा अथ च दैवतमत्र विष्णु: ॥१६॥
नैऋत्य कोणांत निऋति, ईशान्य कोणांत ईश्वर, आग्नेय कोणांत अग्नी, वायव्य कोणांत
वायु व अधोदिशेंत विष्णु दैवत व स्वामी अशीं पांच दैवते आहेत ॥१६॥
सद्योजातं वामदेवाय चेति तत्पुरुषायेति चेशा नमंत्र: ॥
रेभ्योऽथ घोरेभ्य इति ब्रम्ह ॥
यजु: ष्वीशान: पंचवक्त्रं पुरस्तात् ॥१७॥
सद्योजातं, वामदेवाय, तत्पुरुषाय, ईशान:,अघोरेभ्योऽथ, घोरभ्या, वगैरे यजुर्वेदाच्या मंत्रांत सद्योजात,
वामदेव, तत्पुरुष,ईशान आणि अघोर व घोर अशी परमेश्वरांची पंच मुखे वर्णिली आहेत ॥१७॥
सार्धत्रिहस्तो यदि स्थूल भोगो ॥
ह्यंगुष्ठ्मात्र प्रमितं हि लिंगम् ॥
पर्वार्धमात्रं मसुरप्रमाणम् ॥
प्रमाणहीनं हि भवेत्प्रमाणम् ॥१८॥
साडेतीन हात लांबीचा जो देह तोच स्थूल देह होय. लिंड्ग देह अंगुष्ठप्रयाण असून कारण देह अरध्या पोर
एवढा असतो. महाकारण देह मसुरे एवढा असून पांचवा देह प्रमाणरहित आहे. ॥१८॥
पृथक् रक्तपीतं तथा शुभ्रवर्णम् ॥ तथा कर्बुरं
श्यामवर्णादिभूतम् ॥ नीलं सुनीलं शुद्धपीतं
सुशुभ्रम् ॥ तथा पंचमं पीतवर्णं पुरस्तात् ॥१९॥
लाल, पिवळा, शुभ्र, चित्रविचित्र आणि काळा हे पाचे मुख्य पाच रंग असून - नील, अतिशय नील, शुद्ध पिवळा,
अतिशय शुभ्र वगैरे इतर वरील पांचांचेच मकार आहेत ॥१९॥
खेचरी भूचरी चैव चाचरी च अगोचरी ॥
उन्मनी चेति विख्याता: पंच मुद्रा: प्रकीर्तिता: ॥२०॥
खेचरी, भूचरी, चाचरी, अगोचरी आणि उन्मन,अशा पाच मुद्रा प्रसिद्ध आहेत ॥२०॥