पार्वत्युवाच ।
विहंगो बाहनं यस्य त्रिकचा यस्य भूषणं ॥
सालपा वामभागस्था स देव: शरणं मम ॥१॥
पार्वती म्हणते:- ज्याचे वाहन गरूड आहे, ज्याचे भूषण कौस्तुभ आहे आणि ज्याच्या वामभागी लक्ष्मी आहे
तो देव माझा रक्षक आहे ॥१॥
परीक्षिच्छ्र्वण्म चक्रे कीर्तनं नारदा: शुक: ॥
स्मरण्म शिवमर्हादौ लक्ष्मीश्च पादसेवनं ॥२॥
परीक्षितीने जसे ऐकले, नारद व शुक यांनी जसे कीर्तन केले, शिव आणि प्रल्हाद यांनी जे स्मरण केले,
लक्ष्मीने जसे पादसेवन केले ॥२॥
अर्चनं पूजनं ध्यानं पृथुराजादिभि: कृतं ॥
वंदनं तूद्धवाकुरौ दास्यं तार्क्ष्यहनूमतौ ॥३॥
पृथुराजदिकांनी जसे पूजन-अर्चन व ध्यान केले उद्धव आणि अक्रूर यांने जसे वंदन केले आणि गरूड
व हनुमान यांनी दास्य केले ॥३॥
सख्यमर्जुनकर्तव्यं बलेश्चात्मनिवेदनं ॥
भक्ति नवविधां कृत्वा कैवल्यं प्राप्यते परं ॥४॥
अर्जुनाने जसे सख्य केले व बलीने ज्याप्रमाणे आत्मनिवेदन केले त्याप्रमाणे नवविधा भक्ति केली असता
परमकैवल्य प्राप्त होते ॥४॥
श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनं ॥
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं ॥५॥
एणेप्रमाणे-श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन,अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदनभक्ति नऊ प्रकारची
विष्णुची भक्ती आहे ॥५॥
वेदांतन्यायमीमांसातर्कन्यायादिकं तथा ॥
चार्वाकादीनि शास्त्राणि षड्दर्शनपि स्मृतं ॥६॥
वेदांत, न्याय, मीमांसा, तर्कन्यासादिक ही सदा दर्शने व चार्वाकादिक आहेत ॥६॥
कापालिकश्च जैतश्च जंगमो ब्रम्हणस्तथा ॥
संन्यासी च तथा सोऽपिषडदर्शनधरा: स्मृता ॥७॥
कापालिक, जैन, जंगम, ब्राम्हण, संन्यासी, चार्वाक,इत्यादी त्या दर्शनांचे प्रवर्तक होत. ॥७॥
शैव: शाक्तास्तथा सौरा गाणपत्यास्तथैवच ॥
जैनाश्च वैष्णवा: प्रोक्ता: षड्दर्शनमया: स्मृता: ॥८॥
शैव, शाक्त, सौर, गाणपत्य, जैन, वैष्णव इत्यादि संप्रदाय षड्दर्शनमय आहेत ॥८॥
हस्त: पवित्रो यदि दानपुण्यं पादौ पवित्रौ यदि तीर्थयात्रा ॥
वाक्यं पवित्रं यदि रामनाम ह्यदै पवित्रं यदि ब्रम्हनिष्ठा ॥९॥
दानपुण्यानें हात पवित्र होतात, तीर्थयात्रा केल्या असता पाय पवित्र होतात, रामनामोच्चारानें वाणी पवित्र
आणि ब्रम्हनिष्ठेने ह्यदय पवित्र होते ॥९॥
ज्ञानं विरागो नियमो यमश्च स्वाध्यायवर्णाश्रमध्रर्मकर्म ॥
भक्ति: परेशस्य सतां प्रसंगो मोक्षस्य मार्ग प्रवदंति संत: ॥१०॥
शास्त्रांचे यथार्थ ज्ञान, विरक्ति, चित्तवृत्तीचे नियमन, जितेंद्रियता, वेदाध्ययन, वर्णाप्रमाणे योग्य असेल तो धर्म आणि कर्म,
परमेश्वराच्या ठायी पूर्ण निष्ठा आणी संतसमागम - ह्या गोष्टी मोक्षाचा मार्ग दाखवतात असें साधु म्हणतात ॥१०॥