अध्याय तिसरा - श्लोक १ ते १०

कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.

पार्वत्युवाच ।
मृत्यूकाले जगन्नाथ काशीपुर्यां हि प्राणिनाम्‍ ॥
उपदेश: कथं तेषां तन्मे ब्रूहि महेश्वर ॥१॥
पार्वती म्हणते :- काशीपुरीत मृत्युसमयी हे जगन्नाथा तू प्राण्यांना उपदेश करितोस, पण त्यामुळे ते मुक्त कसे होतात ? ॥१॥
ईश्वर उवाच ।
ॐकारं बिंदुसंयुक्त नित्यं ध्यायन्ति योगिन: ॥
अस्मिन्मध्ये स्थितं तत्वं गुरवो दर्शयन्ति तत्‍ ॥२॥
ईश्वर म्हणतात:- ज्या बिंदुयुक्त ॐकाराचे ध्यान योगीजन सदोदित करतात त्यांतच ते तत्व राहिलेले आहे.
त्याचे दर्शन गुरु करवितात ॥२॥
ओमित्येव परं ब्रम्ह सर्व तत्वानुग्राहकम्‍ ॥
आब्रम्हस्तत्रपर्यंन्तं सर्वानुग्रहकारणम्‍ ॥३॥
ॐ हेंच परब्रम्ह आहे. तेच सर्व तत्वांवर अनुग्रह करणारें आहे. तेंच आब्रम्हस्तंबपर्यंत जेवढ्या म्हणून वस्तु
आहेत त्या सर्वांवर अनुग्रह करतें ॥३॥
प्रथमं तारकं ब्रम्ह द्वितीयं दण्डब्रमकम्‍ ॥
तृतीयं कुण्डलं ब्रम्ह चतुर्थं ब्रम्ह चन्द्रकम्‍ ॥४॥
पहिले ब्रम्हतारक, दुसरे दंडब्रम्ह, तिसरे कुंडलब्रम्ह आणि चवथे चंद्रकब्रम्ह होय ॥४॥
पंचमं बिंदुब्रम्हाथ प्रणवे ब्रम्ह पंचकम्‍ ॥
वेदगर्भसमुद्धुतं तदेव यन्निरंजनम्‍ ॥५॥
पांचही बिंदुब्रम्ह ही पाच तत्वे प्रणवात स्थिर असून जे निरंजन ब्रम्ह ते वेदगर्भापासून उत्पन्न झाले आहे ॥५॥
तारकं च भवेब्रम्हा दण्डकं विष्णुरुच्यते ॥
कुंडल्यं हि तथा रुद्रो अर्धचन्द्र: स ईश्वर: ॥ ६॥
तारकब्रम्ह ब्रम्हा, दंडकब्रम्ह विष्णु, कुंडलब्रम्ह, रुद्र आणि अर्धचंद्रब्रम्ह ईश्वर होय ॥६॥
बिंदु: सदाशिव: साक्षात्‍ प्रणवे पंच देवता: ॥
निरज्जनस्तदातीत उत्पत्तिस्थितिकारणम्‍ ॥७॥
ॐकारावरील बिंदु हा साक्षात्‍ सदाशिव असून याप्रमाणे प्रणवांत देवपंचायतन आहे. सृष्टीची-उप्तत्ति स्थिती
करणारा जो निरंजन परमात्मा तो या पांच देवतांहून व त्यांच्या अगदी निराळा व विलक्षण आहे ॥७॥
ब्रम्हा त्रिकूटस्थानस्थो ह्यकाराक्षरसंज्ञित: ॥
वाग्वैखरी ह्यवस्था तु जागृति: स्थूलदेहकम्‍ ॥८॥
ब्रम्हा त्रिकूटस्थ असून अकाराक्षर हे त्यांचे नाव आहे. त्याची वाणी वैखरी असून अवस्था जागृति आणि देह स्थूल आहे ॥८॥
र्‍हस्वमात्रा हि ऋग्वेदो रजोगुण: प्रकिर्तित: ॥
एवत्तारकं विज्ञेयं रक्तपंकजमध्यगम्‍ ॥९॥
त्याची र्‍हस्व मात्रा ऋग्वेद असून रजोगुण म्हणून वर्णन केलेले आहे. तारक ब्रम्ह (उदरस्थ) रक्तकमलाच्य मध्यभागी असते ॥९॥
विष्णोस्तु श्रीहटस्थानमुकाराक्षरसंज्ञितम्‍ ॥
दीर्घमात्रा मध्यमा च लिंगदेहस्तथैव च ॥१०॥
विष्णुंचे स्थान श्रीहट हें असून त्याची उकाराक्षर संज्ञा आहे. याची मात्रा दीर्घ असून वाणी मध्यमा व लिंगदेह आहे ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 31, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP