मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसद्गुरुलीलामृत|पूर्वार्ध|अध्याय सातवा| समास दुसरा अध्याय सातवा समास पहिला समास दुसरा समास तिसरा समास चवथा समास पांचवा अध्याय सातवा - समास दुसरा श्रीसद्गुरुलीलामृत Tags : pothisanskritपोथीसंस्कृत समास दुसरा Translation - भाषांतर श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्गुरुवेनम: । श्रीरामसमर्थ । सद्गुरु बहुत म्हणविती । नाना सोंगे दाविती । भोळ्याभाविका फसविती । गल्लोगल्ली कित्येक ॥१॥शब्दज्ञानामाजी चतुर । वेदान्त बोलती घरोघर । उपदेश घ्यावा माझा थोर । ब्रह्म दावितों तुम्हांसी ॥२॥सदगुरुहून देव न श्रेष्ठ । ऐसें सद्गुरु आम्ही वरिष्ठ । विपरीत आधार दाऊन स्पष्ट । भोळयाभाबडया दगा देती ॥३॥कपट बुध्दीनें भोंदुनी । आयाबाया तुच्छ करोनी । गरीब सत्पात्र स्वल्पज्ञानी । यांची करिती हेळणा ॥४॥सत्ताधीष राजे श्रीमान । यांचे होती रज:कण । ऐसें जया विपरीत ज्ञान । त्यास गुरु म्हणों नये ॥५॥जे अधर्मकर्मे सांगती । मजला द्रव्य द्या म्हणती । तयांचा अनुग्रह कल्पांतीं । घेऊं नये कदां ॥६॥द्वेष मत्सर कपट । लोभ तृष्णा वासना खट । भक्तीवाचुनी पोंचट । बोधिती त्यास मानूं नये ॥७॥ज्ञान गर्व आणि ताठा । माझा उपदेश म्हणे मोठा । तरी तो जाण खोटा । कदापी घेऊं नये ॥८॥देहबुध्दी नाही गेली । ब्रह्मविद्या हातीं आली । म्हणती तयांची साउली । पडो देऊं नये ॥९॥अहंब्रह्मास्मिन निर्मळ । आम्हां नाहीं पापाचा मळ । ऐसें बोलती दुर्जन खळ । ती सत्य कलिमूर्ती ॥१०॥आम्ही ब्रह्म ऐसें बोलतां । ब्रह्म न होय सर्वथा । सोडून द्यावी देहा ममता । तरीच तो ज्ञानसिंधू ॥११॥मार्ग चालो असतां कांही । पाहणेचें कारण नाहीं । सहज नेत्रीं दिसून येई । जेथीचें तेथें ॥१२॥आम्ही जाणतों ब्रह्म । हाच दुजेपणाचा भ्रम । अहंता दिसे परम । देहबुध्दीची ॥१३॥ऐसे गुरु बहूत असती । यांचेनि नव्हे वासना निवृत्ती । जेथें मिळे अखंड शांती । त्यांची लक्षणें अवधारा ॥१४॥सद्गुरुस्वरुपाची ओळखण । त्यांचें वर्णन करील कोण । ऐसा कोण जगीं निर्माण । मी अल्पज्ञ काय बोलूं ॥१५॥परि बाह्य थोडे लक्षण । त्यांचें करुं विवरण । जेणें घडेल समाधान । साधकांसी ॥१६॥दया शांतीचा पुतळा । जाणीं चौदा चोसष्ट कळा । परी आपण वेगळा । प्राकृता ऐसा याहोनि ॥१७॥कामक्रोधा नसे ठाव । नव्हे देहबुध्दीची धांव । एक जाणे रामराव । जन प्रियत्व सर्वदा ॥१८॥जाणानि निर्गुणाची खूण । सगुण भक्ती परिपूर्ण । सदा बोले सत्यवचन । पुण्यपावन तपोराशी ॥१९॥सकळ तीर्थ येवोनी । घालिती स्नान जयालागोनी । मी मोठा ऐसा मनीं । न धरी अभिमान ॥२०॥जो भवसागरीं बुडत । तया हात देउनी काढित । शिष्यासी पसरीना हात । कांही द्यावें म्हणोनी ॥२१॥क्वचित् शिष्य आपुला । दुसर्यासी शरण गेला । क्रोध न येई जयाला । तोचि एक सद्गुरु ॥२२॥जागृत स्वप्न सुषुप्तीसी । तीहीं अवस्थे एकसाक्षी । चौदेह वेगळे लक्षी । ऐसा पाहिजे सद्गुरु ॥२३॥तयासी जावे शरण । तोची चुकवील जन्ममरण । या व्यतिरिक्त असतां लक्षण । शिष्य समाधान करीना ॥२४॥कांहीच नसतां ज्ञान । कोरडा धरी अभिमान । हात अधर्म सत्य जाण । तुवां तेथें नवजावें ॥२५॥गुरु ओळख न सांपडे तरी । वरील लक्षणे बाह्यात्कारई । असली तरी चरणावरी । मस्तक ठेविजे ॥२६॥दुजेपणाची मात । विसरोनि जाय तेथ । विनवावे सद्गुरु समर्थ । मोक्षेच्छा धरूनी ॥२७॥बहुत केल्या येरझारा । वासना घेऊं नेदी थारा । अज्ञान दुबळा दातारा । शरण आलों तुम्हांसी ॥२८॥मन वैखरी एक करी । अज्ञान दीनत्वातें धरी । अहंता सांदोन दुरी । विनवावे श्रीगुरुसी ॥२१॥गुरुवचन हाचि स्वार्थ । गुरुवचन हाचि परमार्थ । गुरुवचनावीण व्यर्थ । सकलों कांही ॥३०॥घेवोनि अनुग्रह प्रसाद । सेवावे सद्गुरुपद । कृपाकटाक्षें जाईल खेद । वासना वृत्ती ॥३१॥सद्गुरु कृपा व्हावयासी । कारण विश्वास निश्चयेसी । गुरुआज्ञा प्राणासरसी । मानितां वृत्ती वळतसे ॥३२॥शरण जावोनि गुरुसी । साधनी झिजवा शरीरासी साधन स्थिती आहे कैशी । सांगू परमार्थी जनहो ॥३३॥शुध्द साधकाची खूण । मी आणि माझेपण । मिथ्या टाकून अवगुण । शुध्दज्ञानी रहावें ॥३४॥निरिच्छ सदा असावें । मन जाळून स्वस्थ बसावें । आपलें स्वरुपीं मिळून जावें । कल्पनातीत ॥३५॥वासना बीज जाळुनी । आत्मज्ञान पाहावें झणी । पुन्हां जन्मास त्यांनी । पुनरावृत्तीस न यावें ॥३६॥सामर्थे मिळवूनी सिध्दी । जगीं मिरविती प्रसिध्दि । उठवोनि जे प्रेतादि । दिवसा मशाली लाविती ॥३७॥पुढें कोणी न बोलत । समस्त राजे पादाक्रांत । आत्मस्तुती सदा डुलत । आनंदित होवोनि ॥३८॥परी वासनाबीज न मोडे । आणि सिध्द ह्मणविती गाढे । आत्मज्ञानाची म्हणे ते वेडे । तयालागीं ॥३९॥वासना गेली मुरोन । तीच आत्मज्ञानी खूण । दुधाअसी घातलें मुरवण । तया दुध कोण म्हणें ॥४०॥वृक्ष पाहतां आहे एक । पल्लव दिसती हजारों लाख । विश्वीं विश्वंभर एक । भूतें पाहता अनंतची ॥४१॥वासना निमालया पाठीं । आत्मरुप एकहष्टी । नातरी भूत सृष्टी । विविध प्रकार ॥४२॥वासना निमालया पाही । देहीं असतांच विदेही । सुखदु:खादी सर्वही । देहांकरितां ॥४३॥धान्य भाजोन्न्न काढिलें । परी ते दिसेना नाहीं झालें । तैसें दृष्य जरी भासलें । तरी ते निरुपद्रवी ॥४४॥कोणासी न वाटे वांकडे । ऐसे शब्द बोलावे रोकडे । साधन तरी करावें गाढें । जनासीहि रिझवावें ॥४५॥वृत्ती असावी कल्पना रहित । सदा रहावें ध्यानस्त । देहभाव त्यागोनि सतत । मग रामीं रंगवावें ॥४६॥मन बुध्दी दुराचारी । देहीं गुंतती बहुपरी । कैसा पावेल पैलतिरीं । आत्मज्ञान मुखीं बोलतां ॥४७॥साधनाविणें आत्मज्ञान । अंगी न बाणे म्हणोन । वृथा बोलूच नये जान । अंतरी मात्र विवरावें ॥४८॥स्वप्नीं बैसला नृपासनीं । जागृती भिक्षा दुजे दिनीं । कां राजपत्नी नाटय सदनी । झालीया काय प्राप्त ॥४९॥पाळणा बाशिंग बांधलें । वरात मिरवोनि घरी आले । तत्क्षणीं तया मूल झालें । वार्ता परिसली ॥५०॥तदुपरी साधनाविण । बोलूं नय आत्मज्ञान । साधनीं असावें परिपूर्ण । परी सिध्द म्हणऊं नये ॥५१॥शंकर करितसे साधन । वैराग्यशील जाण योगीं । ऐसा दुजा आहे कोण । त्रैलोक्य विवरीं ॥५२॥शतकोटिचे काढोनि सार । उमेसह स्मरे शंकर । तेथे मानव बापुडे किंकर । पाड काय तयापुढें ॥५३॥पाक निष्पत्ती न होतां क्षुधा न निवारे सर्वथा । तेंवी साधनाविणें ज्ञान हातां । येईना निश्चयें ॥५४॥स्वस्वरुपीं व्हावे लीन । ऐसें करावें साधन । परी वृत्ति सावरोन । साधक दृढ धरावें ॥५५॥साधक स्थिती बाणॊनि गेली । ज्ञानदशा प्राप्त झाली । परी वृत्ति पाहिजे सांभाळिली । वाटमारु जाणोनि ॥५६॥जाणावें तरी वेदसार । सकळ तीर्थाचें माहेर । साधकांचे निजवर । परी नेणते वागावें ॥५७॥अर्ध हळकुंडें पिवळे झाले । ऐसे बहुत बुडाले । यास्तव साधकें वायचाळे । करुं नये सर्वथा ॥५८॥आणिक एक साधन खूण । मुमुक्षु असावें पूर्ण । साधनी विश्वास गहन । तरीच राही ॥५९॥मुमुक्षु नसतां चावटी । साधनी कपाळी आठी । त्रासेल आपुलें पोटी । त्यांचे काम नव्हे हें ॥६०॥कसाबसा नाहीं गाईची दया । जारिणीसी नसे बालकाची माया । तैसें मुमुक्षु नसता वाया । कुतर्की होय बाधक ॥६१॥आतां ऐका श्रोतेजन । गुरुपुत्राचें लक्षण । कोठे चुकला असेल दीन । तरी सावध करावें ॥६२॥नव्हें हें माझ्या पदरीचें । स्वयें जाणा गुरुगृहीचें । लक्षण कथिलें निर्गुणाचें । खूण समजा गुरु घरची ॥६३॥निर्गुणाची जाणुन खूण । सगुणाचें करावें ध्यान । नित्य नेम जप अनुष्ठान । मानस पूजा करावी ॥६४॥आधीं करुन आध्यात्म श्रवण । विवर विवरो निरुपण । तीर्थ व्रत होम दान । साधू ब्राह्मणीं आदर ॥६५॥प्रेमें करावें भजन पुराण । वेदशास्त्री आस्था पूर्ण । भूतदया समसमान । शांति गहन असावी ॥६६॥लीन असावें प्राणीमात्रांसी । मत्सर नसावा मानसी । ऐसें जाणोन राहसी । तरी श्लाध्य वाणें ॥६७॥राम चिंतन करीत जावें । वैखरी क्ष्ण न स्थिरावें । कामक्रोधाचे प्राण घ्यावे । विवेकें सतत ॥६८॥जे वाल्मकीचें परम सार । प्रल्हादाचें अंतर। मारुती जपे निरंतर । शिव ध्याई सर्वदा ॥६९॥पार्वती श्रीविश्वजननी । नित्य नेम जपे स्मरणी । तेंच रामनाम ध्यानीं । आणि मुखीहि असावें ॥७०॥ऐशा नेमाच्या हातवटी । प्राणी कधी न होय कष्टी । भवबंधन आटाआटी । विरोन होय समाधान ॥७१॥अभ्यास लावितां मना । दुजी न उठे वासना । अंतकाळी भवबंधना । पासोनि सोडवितसे ॥७२॥नित्य नेम दृढ करी । नेमदृढ झालियावरी । देहात्मबुध्दी सत्वरी । लया जाय ॥७३॥ ऐसे हें न होय जरी । दु:ख भोगावें जन्मवरी । यम यातना क्लेश भारी । न चुकेचि निर्धार हा ॥७४॥क्लेशें फिरावें देह नाना क। चारी खाणी ध्यानी आणा । यात संदेह नसे जाणा । दु:ख शोक अनिवार ॥७५॥हे मागील होतसे उगवण आतां राखावें सावधपण । स्वाधीन करावें आपुलें मन । भलते भ्रांती पडू नये ॥७६॥देह जातां कष्ट भारी । जरी मनाचे पडशील भरी । तरी तुज नये पदरीं । उन्मत्तपणें सत्यज्ञान ॥७७॥ब्रह्मज्ञान फार कठीण । तें राघवाचे भक्तीविण । म्हणे मज झालें आत्मज्ञान । तो देवही न जाणावा ॥७८॥एकवीस सहस्त्र सहाशे जप । हें असे शिवाचें माप । यासीव म्हणती अजपाजव । शिवयोगी जपतसे ॥७९॥सर्व देवांमाजि शिरोमणि । अयोनी संभव लावण्य खाणी । पूर्णब्रह्म जो निर्गुणी । सृष्टी कारणें देह धरिला ॥८०॥ब्रह्मरंध्री कुंडलिनी लाहे । तरी विष बाधा न जाये । जोवरी सद्गुण देह आहे । तोवरी भजन सुटेना ॥८१॥समाधी लावोन बैसती देख । न तुटती देहकामादि कलंक । देहसंबंधी विष नि:शंक । नामावाचोन शमेना ॥८२॥देहस्मरण राहे कुडीं । तोंवरी रामनाम न सोडी । शिव वाखित निजगोडी । मानवाचा पाड काय ॥८३॥म्हणोन सांगितलें साधन । अंतरनिष्ठेची खूण । सोडून षड्रीपुचें बंधन । अखंड चिंतन असावें ॥८४॥रामरुप होऊन चिंतन करावें । देहासाठीं वेगळें वागावें । अंतरी जग पाहावें । कैसे आहे ॥८५॥एक देहाचेचि अवयव । नामकर्णी भिन्नभाव । चितन्य भरलें स्वयमेव । दृश्यीं राहोन जाणिजे ॥८६॥आपण एक स्मरण एक । याचे नाव हीन विवेक । चित्त देवोनि थोडें एके । आपुलें आपण स्मरण करी ॥८७॥कागद शाई भिन्न असतां । एक करी । लेखक मिळतां । सुवर्ण रज आणि सरी पाहतां । एकची करणी ॥८८॥तैसे अभ्यासावें साधन । प्रकृती पुरुष एक जाण । निष्काम करुनिया मन । रामरुप पाहावें ॥८९॥परे पासोन वैखरीपर्यंत । रामनाम घ्यावें सतत । हेंच सार साधका सत्य । मुख्यत्वें जाणावें ॥९०॥वैखरीस रामनामाविण । न पडावें कधीं खंडण । कोठेंहि न फिरावें मन । तेंचि अधिष्ठान परेचें ॥९१॥वासना क्षय साधनसार । रामनाम दोन अक्षर । गुरुमुखीं ओळख सत्वर । कृपेकरोनि घ्यावी ॥९२॥आतां वाहून आणिक । संशय घेसी तरी देख । न दावी आपुलें मुख । आम्हांप्रती ॥९३॥ऐसी ही अमृतगुटिका । सेविता दवडील धोका । साधकहो नित्य धोका । मननक्रियेसहित ॥९४॥इति श्रीसद गुरुलीलामृते सप्तोमोध्यायांतर्गत द्वितियसमास: । ओवीसंख्या ॥९४॥॥ श्रीगुरूनाथार्पणमस्तु ॥॥ श्रीराम समर्थ ॥ N/A References : N/A Last Updated : October 23, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP