गणेश जयंती - शिवह्रदयी गणपतिभावोद्भव
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता. २८-८-१९३०
समाधि-निर्भर असतां शिवासी । ब्रह्म ह्रदयासी झगटले ॥१॥
ब्रह्मानुभावे शिव आनंदांत डोले । ह्र्दयांत खेळे सगुणरुप ॥२॥
गणपति भाव ह्र्दयी उदेला । करी बाळलीला ह्र्दयांत ॥३॥
कौतुकाने पाहे सदाशिव देव । सुकुमार भाव बालकाचा ॥४॥
अपेक्षा चित्तासी प्रत्यक्ष हा सुत । रहावा खेळत होवोनियां ॥५॥
मग प्रार्थितसे प्रणव-रुपासी । तया गणेशासीं सदाशिव ॥६॥
पुत्रत्वाचे नाते तुझे मजपाशी । तेच सत्यत्वासी आणावे की ॥७॥
विनायक म्हणे ब्रह्म साकारले । बाळरुप झाले गणेशात्मक ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : January 21, 2020
TOP