गणेश जयंती - विघ्नसुरकथा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


नृप एक होता नामे अभिनंदन । इंद्राचे पूजन करीना तो ॥१॥
हविर्भाग इंद्रा यज्ञांत देईना । तया आवाहीना नृपवर ॥२॥
म्हणोनियां इंद्रे कालासी प्रार्थिले । शासनार्थ भले नृपतिच्या ॥३॥
तोच विघ्नसुर दैत्य प्रगटला । नृप तो मारीला तया दैत्ये ॥४॥
पुण्यकर्माचा तो उच्छेद करीत । कांही न चालूं देत यज्ञयाग ॥५॥
सकळ राहिले कर्म भूमीवरी । हाहा:कार तरी थोर झाला ॥६॥
ब्रम्हयासी सर्व शरण मग गेले । तया निवेदिले वृत्त त्याचे ॥७॥
गणेशस्तवन कराया सांगत । सकळ प्रार्थित गणपासी ॥८॥
प्रगटले तेव्हा स्वये गणपती । दैत्यासी झुंजती आतुर्बळी ॥९॥
विघ्नासुर केला पराभूत देवे । प्रार्थि नम्रभावे दैत्य देवा ॥१०॥
तेव्हा त्यास दिला जवळीक वास । आत्मवश त्यास केले देवे ॥११॥
जेथे गणपतीपूजन न प्रथम । न घडे ते कर्म विघ्वंसी तो ॥१२॥
ऐसा गणेशाचा भक्त विघ्नासुर । प्रताप प्रखर तयाची की ॥१३॥
विनायक म्हणे आम्हां विघ्नासुर । न बाधो साचार गणराजा ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP