सूत सांगे, राजा, ऐक, दशरथा । पुढिलिया अर्था सावधाने ॥१॥
कुमार सांगताती मुनिश्रेष्ठालागी । ऋष्यशृंग जगी ख्यात होय ॥२॥
अयोध्येचा राजा होईल पुत्रकाम । त्यासी परंधाम प्राप्ति होय ॥३॥
ऋष्यशृंगा राजा आणिल यज्ञासी । त्या रोमपादासी विनवोनी ॥४॥
शान्ता भार्येसह आणिल मुनीसी । करिल यज्ञासी त्याकरवी ॥५॥
तेव्हा पुरुषोत्तम लाभेल वंशासी । पावेल ख्यातीसी सूर्यवंश ॥६॥
ऐसे आहे जाणा महिमान त्याचे । तया ऋष्यशृंगाचे विप्रवर ॥७॥
ऐसा कुमारानी वृतान्त कथीला । तोच निवेदिला, राज तूज ॥८॥
विनायक म्हणे कथा राघवाची । अनुपम साची मधुर की ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP