रामनवनी - पायसप्राप्ति
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
शरयू नदीचे उत्तर तीरासी । आरंभी यज्ञासी दशरथ ॥१॥
अश्व सोडियेला सोपाध्याय भला । मंडप घातला थोर तेथे ॥२॥
वेदी रचियेल्या इष्टका मांडील्या । यथाशास्त्र भल्या तयाठायी ॥३॥
सकळ नृपवर बोलाविले त्याही । करित तो पाही यज्ञालागी ॥४॥
पंडित विद्वान कलावान कोणी । सकलही आणी बोलावोनी ॥५॥
आले तपोधन ब्रह्मनिष्ठ आले । सर्व गजबजले यज्ञस्थान ॥६॥
वर्ष होतां आला घोडा परतोनी । द्रव्याते घेवोनी अपार की ॥७॥
यज्ञ थोर झाला धन्यवाद गाती । देतां द्रव्य मिती नाही तेव्हा ॥८॥
हिरण्यवस्त्रांचा पूर की लोटला । समृद्ध जाहला भिक्षुक जन ॥९॥
मग ऋष्यशृंगाप्रति बोले राजा । आतां महाराजा कृपा करा ॥१०॥
पुत्रकामेष्टिते यजावे म्हणत । जेणे पुत्र होत मजलागी ॥११॥
ऋष्यशृंगे अवश्य मग म्हणीतले । विधान की केले थोर तेव्हां ॥१२॥
स्वये प्राजापत्य पायस देतसे । नृपति होतसे कृतकृत्य ॥१३॥
पायसार्ध देई प्रथम कौसल्येला । तदर्ध सुमित्रेला देत असे ॥१४॥
अर्ध देत मग राजा कैकयीला । तदर्ध सुमित्रेला देई पुन्हां ॥१५॥
ऐसा झाला अस प्रसाद राजाला । आशीर्वादे भला ऋष्यशृंगाच्या ॥१६॥
विनायक म्हणे धरी अवतार । स्वये तो श्रीकर सूर्यवंशी ॥१७॥
N/A
References : N/A
Last Updated : January 25, 2020
TOP