ऋध्दिपुरवर्णन - प्रकरण १ ते ५
महानुभाव पंथातील थोर संत नारायण व्यास बहाळिये यांनी ऋध्दिपुरवर्णन काव्याची रचना केली.
प्रकरण १ : परावाचामहत्त्व, ओव्या ३
जे आर्तवछनंदनी : तापोपसमन कादंबिनी : ते नमस्करुं अमृतसंजिवनी : श्रीदेवोवाणी ॥१॥
जे वेधाचा उगउ : पुर्णबोधाचा जीउ : ब्रह्मविद्ये प्रसउ : जे परावाचा ॥२॥
जे विवेकाची जन्मभूमी : परसूखाची उर्मी : असो हे केवळीं परब्रह्मीं : प्रकटली जे ॥३॥
प्रकरण २ : कृपामहत्त्व, ओव्या ४
जो आपार सूस्वादु : निस्तरंग आगाधु : तिये आकरीं आनंदु : वलंबिला जीया ॥४॥
घेउनि आज्ञानें उसंगिए : आर्ती लाल्हाति जीयें : तया वोरसें देतसे पेहें : माउली ते ॥५॥
पडिलेया भवतमीं निबिडे: जिया प्रतिभवीं उजिडे : तेणेंही वांग्मार्तंडे : नुजळेचि मी : ॥६॥
ऐस जात्यंध आंधस्तु : वरि भवरोगी ग्रहस्तु : तया मज तो वाग्माहापथु : केवी टाके ॥७॥
प्रकरण ३ : परावाचामहत्त्व, ओव्या ४
तर्हीं परवाकचांदिणें : करुं द्वीजराजकूळीं पारणें : अंतरीं न वेधिजे पाषाणें : परि होये तापा हाणी ॥८॥
दैवयोगे ब्रह्मवाणीं : जरि न ल्हाइजेचि श्रवणी : तरि जीवा होये सीरणी : परजाणिवेची ॥९॥
जे आपण आगस्ति होउनी : अगाधा जाणिवांतें उमाणी : पुन हे प्रकटली श्रीचक्रपाणी : तो कल्सोद्भउ ॥१०॥
सकळ ज्ञानाचां सेंवटीं : करुनि नीगमासि ठी : मग बैसवी पाटीं : परज्ञानाचां ॥११॥
प्रकरण ४ : श्रीनागांबिका महत्त्व, ओव्या ३
तिया वाचा सूधाकरी : निमस्त तत्परी : प्रेमामृत जीवचकोरी : लाधलें जीया ॥१२॥
ते प्रसीध नागांबिका : प्रसन्न होये आइका : तरि सीध सारखत मूर्खा : प्रकटों लागे ॥१३॥
सृष्टीपरौता जिया । सौरसु होये बोलावेया : ते नमस्करुं ब्रह्मतनया : श्रीनागांबिका ॥१४॥
प्रकरण ५ : श्रीनागादेवाचार्य महत्त्व, ओव्या १०
परवाकरससीधी : जो जीवडोंगराते वेधी : तो आतां सूवर्णकृतबूधी : नमिन नागार्जूनू ॥१५॥
सोधुनि भवपारधु : जो अनादिरससीधु : तो लाधला शब्दवेधु : जेणें धातुर्वादियें ॥१६॥
जो विघ्नजातां वरिया : उपावो भववैरिया : जाला दीक्षागुरु आचार्या : सृष्टीचेया ॥१७॥
आपक्षा पाखवां देउनी : जेवी जीववी पक्षिणी : तेवि श्रीचक्रपाणी : पाळिला जो ॥१८॥
किं तो आणिकीतें न साहे : जेणें मोकलिली धाये : भणौनि वोरसें ते माये : तया पाठीं धांवे ॥१९॥
कीं लेउनि मायावेषीचें लेणें : तो बापुचि मीं जाणें : दोन्हीं स्नेह एकवटापणें : वोळला जेया ॥२०॥
असूरे सृष्टीचेया : पराभव दाउनि आचार्या : मग जगजीवनें लोकि या : जेणें सूकाळ केला ॥२१॥
परि हा श्रवणाचा मीतु : होये जीवाचा हीतु : न भंगतां अर्थु : जयवादी जो ॥२२॥
आत्मयारामाचेनि वीरहें : जया जीवीत न साहे : नीर्वाणी जो लाहे : कैवल्यातें ॥२३॥
बाप कळा वानु कैसी : जे भास्करातें प्रकासी : जाणिवां पंडितांसी : अधिकरण होये ॥२४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 28, 2020
TOP