ऋध्दिपुरवर्णन - प्रकरण २६ ते ३०

महानुभाव पंथातील थोर संत नारायण व्यास बहाळिये यांनी ऋध्दिपुरवर्णन काव्याची रचना केली.


प्रकरण २६ : राजमढ पटिशाळेचे खांब वर्णन, ओव्या ५

कृपाकटाक्षाचेनि वोलें : पाषाण कोंभ फुटलें : तैसे स्थंब मीरवले : पटिसाळेचे ॥३५१॥
कीं देवाचा प्रसाद गहनु : भणौनि माथां वाहाति स्थाणू : आहो अंगीकृत तमोगुणु : नीरसावेया ॥३५२॥
कीं आत्मजाची थोरी : देखौनि सौरसु भीतरीं : आपण ताटीस्त द्वारी : पावले ते ॥३५३॥
ना ते आर्ता परिहारें : दावीति पाषाणाची सरीरे : जे सांडिलेया ईश्वरे : परि पडतीचि ना ॥३५४॥
संबंधु दीधला देवें : भणौनि लागति वानावे : ते खांब नमस्क (रु) नि अघवे : देखें भींतभंग ॥३५५॥

प्रकरण २७ : भीतभंग वर्णन, ओव्या ६

ते उंच तरि ऐसे : मांडले दैवंवसें : कीं देवाचिनि श्रीकरस्पर्शे: थोरावले ॥३५६॥
की सकळ सीधांता गुढ : ते परवस्तु केवि उघड : भणौनि आपण जाली आड : तदा काळीं ॥३५७॥
पापभारें चांचल्यें प्रूथवी: तेथ येउनि उर्वी : कृपादृष्टी नीहाळुनि गोसावी : स्थीर केली ॥३५८॥
भूतभवीस्यवर्तमानी : आभयें दीधलें मेदनी : श्रीकरें स्पर्श मी मानी : पाठि थापटीली ॥३५९॥
कीं स्वसंवैद्याचीये खूणें : आन कवण जाणे : जें का आगनीत गणने : रुप कीजे ॥३६०॥
श्रीमूखें आनुवादु : संख्या करि गोविंदु : तो नमस्कारुनि संबंधु : वीशेषाचा ॥३६१॥

प्रकरण २८ : राजमढद्वार वर्णन, ओव्या ८

आसो हे भींतभंद्ग नमस्कारिले : तवं राजद्वार देखिलें : जैसें भांडार उघडलें : परसूखाचें ॥३६२॥
कीं तें धर्मगीरीचें कपाट : कीं वीवेकसीहाचा दरकूटा : कीं मोक्षगडाचा दारवठा : उघडला तो ॥३६३॥
ना तरि द्वाराचेनि मीसें : मूख पसरौनि जैसें : राजमठू झाडा देत असे : बाह्याभ्यांतरीं ॥३६४॥
म्हणे सर्वस्वें नागवलां : भीतरु रीता ठेला : न पत्याल यां बोलां : भणौनि दावीतु असें ॥३६५॥
कीं भीतरू भरला आकासा : तारका स्वयंप्रकासा : नांदतां राजमठू जैसा : ब्रह्मगोळु ॥३६६॥
कीं भीतरीलां जीवां : गोसावीं देखिला नीगावा : राजद्वार नव्हे हावां : धर्मखींडी ॥३६७॥
जेणें द्वारें बीजें : कीजे प्रभुराजें : तेथ एकलेया कां जाइजे : नीलजें मींया ॥३६८॥
आपुला श्रीकरु देउनी : मूक्ते केलें जनी : तें राजद्वार नमस्करुनी : देखे उंबरवट ॥३६९॥

प्रकरण २९ : उंबरवटा वर्णन, ओव्या ६

म्हणे कवण दैवं केलें उपळीं : जे सरागी चरणकमळीं : बीजे करितां देहळीं : पवीत्र कीजे ॥३७०॥
तो साजात्या नीजनामा : भणौनि जी परब्रह्मां : लीळां पदें ठेउनि आस्मा : उधरीला ॥३७१॥
कीं बाह्याभ्यांतरा : योजे दृष्टांता पुरा : भणौनि आवडला दातारा : पदें देवों ॥३७२॥
कीं संसाराचेनि त्रसें : जे करुनि होते उसिसें : तयाचें आड पडौनि जैसें : वीनवीते कां ॥३७३॥
समार्जनाचीया योग्यता : वास पाहाती देवता : भणौनि पुजावेया पात्रता : बहुतां जालीं ॥३७४॥
परि काइ दैवं वाखाणी : संबंधु केला श्रीचरणी : जो आब्रह्मा सांडौनी : नमस्कारीजे ॥३७५॥

प्रकरण ३० : राजमढप्रवेश, ओव्या ४७

आतां सांत आणी सूरसू : म्हणीजैल मठप्रवेसू : जेथ नांदला ह्र्षीकेशू : भणौनिया ॥३७६॥
जयाचेनि आज्ञातरणी : लोपले राजसीरोमणी : प्रभुत्वें सांसीनले कव्हणीए : नुधवीति टांगे ॥३७७॥
तया समर्थाचेया एकांता : सौरसू केवि होये प्राकृता : कीं देवो कृपाळु भणौनि आनाथा : आडकाठी नाहीं ॥३७८॥
वेउलीं त्रसीले वछ : कीं पासमूक्त कडुस : पक्षी झडपीलेयां बाळहंस : गीवसी जननीयेतें ॥३७९॥
तैसा भरला वोरसू : करितां मठप्रवेसू : तेथ प्रमये बोलावेया सौरसु : वाचेसि नाहीं ॥३८०॥
तर्‍ही अळंकारेंवीण : न मीरवे काव्यलक्षेण : रत्नें नव्हेति पाषाण : परि राज्या योग्य कीं ॥३८१॥
भणौनि शब्दरत्नसोहज्वळा : जाउनि साहित्याचीया वेलाउळा : भरुनि आणु खोळा : उन्मेखाचिया ॥३८२॥
ग्रंधसुवर्णमूद्रिके : खेवणूं भावमाणिके : मग दर्शना देवों कवतीकें : श्रीप्रभूराया ॥३८३॥
परि काइ काज एणें : मठप्रवेसी जें बोलणें : तें आवधारा नारायेणू म्हणे : श्रोतेयातें ॥३८४॥
व्याधापासौनि सूटलें : आर्त पक्षीणीचें पीलें : जेवि नीडें गीवसू आलें : जननीय़तें ॥३८५॥
असंभवीयाचें लेंकरुं : घे पयोपान हावरु : तें दैवंदत क्षीरसागरु : जेवि लाहे ॥३८६॥
साधनाचां चरीरार्थी : जेवि साध्याची प्राप्ती : ना तरि व्याधिग्रस्त अमृतीं : सौरसू लाहे ॥३८७॥
जळाबाहीरा आवचीता : मीन पडे चडफडीता : तो दैवंवसें मागौता : जळचि लाहे : ॥३८८॥
तेवि तीये राजभुवनीं : जो आनंदु भरला मनीं : तो कई एकीं वाचा वाणी : प्राकृती मीं ॥३८९॥
संभ्रमाचेनि पूरें : झांपलीं बूधीचीं तीरें : तो उछावो न सवरे : इंद्रियेवोघां ॥३९०॥
मना चांचल्य न स्फूरे : बूधि बोधत्व वीसरे : अहंकार अहंतत्वेंसी मूरे : आपणपेंची ॥३९१॥
इंद्रिय चीत्रस्तीतें : जालीं गात्रें स्तीतमंते : हालिचालि कूंठलीई तेथें : बाहेभ्यांतरीं ॥३९२॥
कीं आत्मजाचेनि सळें : स्थंभचि आवतरला बळें : कीं ( नी ) जप्रसादा राउळें : प्रतीष्टीला ॥३९३॥
सर्वागीं उदैला स्वेदु : ढळमळीत घ्र्मबींदु : कीं तो सोमकांत पूर्णचंद्रु : द्रवत जैसा ॥३९४॥
कीं तो वीरहाग्रीचा उबारा : सर्वागीं स्वेदु अवधारा : कीं हो काज भवज्वरा : सांति जैसी ॥३९५॥
की वनमाळीय़ें लावणी : पेलीलें भवतरूसि पाणी : तें वाहात रोमांचसारणी : मज पांतां ॥३९६॥
तें प्रेमपरावृखीं : शरीरक्षेत्र मीं लेखीं : भणौनि कोंभैली पुळकीं : रोमबीजें ॥३९७॥
कीं भवसूत्रभेण : लेइला रोमांचभुषण : कीं पुनर्भवदर्शना : कांटाळैला ॥३९८॥
तें आज्ञान आनाथ बापूडें : कृपा देखौनि उघडें : रोमांचकंच कोडें : लेववीलें ॥३९९॥
ह्रदइं भावाची दाटी : चेतना सांडीली दृष्टी : बास्पसदगदीत कंठीं : तेणें बोलवेना ॥४००॥
कीं आनुभवाचा माथां : वाउनि सूखाचिया लोथा : तेनें पायेमलें दाटती साम्ता : सादु कांपे ॥४०१॥
कीं जाणों नेदी इंद्रिया : जीवा आनंदचोरीयां : भोगितां देखौनि वैरियां : बोलों भीजे ॥४०२॥
वाताहात कदळीपत्रें : तैसीं वेपथें सर्व गात्रें : कीं गुणीय़ा देवाचेनि मंत्रें : थरारीली ॥४०३॥
तें श्रीरंगाचें राहाण : जगप्रसीध अवतरण : जेथ भुतबाधा सांडण : प्रत्यो आती ॥४०४॥
भणौनि तीये देव्हारां : दैवंप्रकृती अवधारा : कंपू नव्हे आंगीं वारा : जगदंबिकेचा ॥४०५॥
की जीवदेहाचें धरणें : मज पांतां सुटे झणें : भणौनि भेण वीवर्णे : सर्व गात्रें ॥४०६॥
ऐसा लंपटू प्रपंचू : जीवो न सके मोचूं : की उजडला देखौनि सोच्यु : काळवंडला ॥४०७॥
दैवं भोगितां अंतरें : कर्मछाया सांडिति गात्रें : कीं गुणीया देवाचेनि मंत्रें : वर्णनासू ॥४०८॥
तें जीवीतसल मीं मानी : पळीपतु वीर्‍हाग्नी : तो भावो उमटसे लोचनी : मीसें अश्रुचेनि ॥४०९॥
कीं ह्रदइं श्रीचरणतळें : परीपुर्ण प्रेमजळें : बोसंडतां तुंब डोळे : वाहातु जैसे ॥४१०॥
अंत:करणा अनन्यभावें : डोलां देखिलें न राहावे : की तेणें वंचीलें स्वभावें : भणौनि सीणति ते ॥४११॥
आतां प्रळयो आठवां : जो ह्रदइं आवतरे सदैवां : जे नीजनाथें कणवा : अवलोकीले ॥४१२॥
मनाबूधितें क्रमूनि : आवडि जीवी राहे भरौनि : तैं आयुष्याची बूडे डोणी : वीयोगार्णवीं ॥४१३॥
पढियें तयाचा वीयोगु : नूरवी आयुष्याचा भोगु : जेवि अस्तवतां पतंद्गु : नूरे दीपसेखे ॥४१४॥
एकें वीरहकातरें : कैसी माणुसें पवीत्रें : जें न साहाति उत्तरें : वीयोगाचीं ॥४१५॥
असो हे आठै : भाव राउळे दीधले दळवैइ : वृतीक जाले ह्रदइं आनुरागाचा ॥४१६॥
रमण गुणवीसेखीं : पारमार्थिका वीषै कीं : भावी मालाथिलें सात्वीकीं : सानुभावातें ॥४१७॥
परि परसूख अनूभवीं : जें सूख संचरें जीवीं : तो रंग गुणयां वांचवी : ऐसा देखो ना ॥४१८॥
ना ना देव्हारां प्रसीध : बहुत आइकों मंत्र सीध : परि वीषए सांड नाहीं बहीर्मूद : नेदेखति ते ॥४१९॥
कवळ्दलीं कामादि दोखीं : दृष्टि न रीगे वर्णावीशेखी : तेवी कर्माभीमानी लोकी : न देखीजे ईश्वरसूख ॥४२०॥
तें परसूख सूखोपचारीं : जेथ सेविले कीकरी : त्या देवाचां सेजारीं : बोली हे ॥४२१॥
आवरुनि भावाची उर्मी : म्हणे जेथ नांदीनलें स्वामी : ते रचना पाहों आम्हीं : नेदूम सूखा चीत ॥४२२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 28, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP