भावगीते - वसंत
गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.
स्वरसाज सुरांचा बाज, खुलवि ऋतुराज
बहरला वसंत ऋतु गे वनीं ।
कुंठातुनि निघती सूर, लावी हुरहुर
कोकिला पंचमं छेडित गानी ।
कलीकली डुले उमलती फुले, सौगंध दरवळे
होतसे, परिसर मादक धुंद ।
यमुना तटि आला रास, खेळण्यां आंस
अवतरे जणु वाटे गोविंद ।
जल निर्मल धरीते ताल, हवेची झुल
कलकले अलगद गोल तरंग ।
केकावलि, मयुरी मोर, भारुनी तीर ।
नाचती थुईथुई दंग ।
गोविंद - छंद लागला उपवनां, पक्षिवृंद बेबंद्
हे अलकापुरीचे इन्द्रधनु, स्वरताल बनुनि स्वच्छंद ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2023
TOP