अभंग २३

मराठीतील कांही अभंगांचे संस्कृतमध्ये भावपूर्व अनुवाद.  


मराठी(मूलम्)

सात पांच तीन दशकांचा मेळा ।
एकतत्वी कळा दावी हरि ॥१॥

तैसे नव्हे नाम सर्व मार्गी वरिष्ठ ।
येथे काही कष्ट न लगती ॥२॥

अजपा जपणे उलट प्राणाचा ।
तेथेही नामाचा निर्धार असे ॥३॥

ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ ।
रामकृष्णी पंथ क्रमियेला ॥४॥

संस्कृतम्

सप्त पञ्च तथा त्रीणि दश चैकत्र मेलितम् ।
मेलोऽयं भासते सर्व एकतत्वात्मके हरौ ॥१॥

नैवं नाम, वरिष्ठं तन्मार्गेषु सकलेषु च ।
न नामस्मरणे कष्टं मनागप्यनुभूयते ॥२॥

सोऽहं हंस इति प्राणे सोऽजपाजपसंज्ञित: ।
तस्मिन्नपि जपे नामस्मरणं विद्यते ध्रुवम् ॥३॥

वक्ति ज्ञानेश्वरो व्यर्थं जीवितं नामवर्जितम् ।
रामकृष्णाख्यमार्गोऽयमत आक्रम्यते मया ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 04, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP