लेखक किर्तनकेसरी : वैद्य कृष्णराव गोविंद जोशी
ज्ञान जोती उजळून वाती करु आरतीसी, स्वामी समर्था मयुरानंदा भावे तुम्हासी ॥धृ.॥
मातृ-पितृ निवर्तलेची बालपणी असती, धृव प्रल्हादा सम भक्तीची, ज्योत उजळवीसी ॥१॥
संश्रृती दारुण प्रपंच झाला परिमनी नासक्ती, श्रीरामाचे ध्यान निरंतर मूर्ती स्थापीयसी ॥२॥
ज्ञानामृत कीर्तन पानाने सर्व जना देशी, अखंड ज्ञानेश्वरी भागवत रामायण पठसी ॥३॥
हरी कीर्तनी दंग असता दुष्टे अग्नीसी, इक्षूदंद कुरणासी लाविले कळले न कवणासी ॥४॥
रामप्रभुरुपे जाऊनी कुरणी, शांतवी अग्निसी, मात ऐकतां दु:खी झाले राम चरण धरीसी ॥५॥
प्रपंच माझा निवाराया रामा धाव घेशी, आता मज नच राहणे रामा ठाव दे चरनासी ॥६॥
जन्मोत्सवाचे कीर्तन कथीले श्रोर्तृ वृंदासी, चैत्र वैद्य नवमीसी मी जाईन स्वर्गासी ॥७॥
वानप्रस्थाश्रमाचरुनी ज्ञानदीप उजळीसी, चातुर्थाश्रम संन्यासाने कर्म त्यक्त होसी ॥८॥
अखंड नाम स्मरण कीर्तन वंशा वर देशी, तव कृपेने भक्ती प्रेमे सुखद वंशांसी ॥९॥
बाल-बालिका, भगिनी-बांधव जनसमुदयासी, आशीस देऊनी सुखकर केले गनती नसे त्यासी,
श्रीरामाचे भजनी अंती त्यक्तीसी देहासी, दत्तपदी मी लीन झालो कृष्ण नमी त्यासी ॥१०॥
: आरती :
जय जय जय गुरुदेव, मंगल सुखधामा, अखिल सनातन स्वामी, सत् चित सुखदाता ॥धृ.॥
निगमागम कलीमल हर पूर्ण ब्रह्मरुपा, ध्याता-ध्यावे-ध्येयची देशी मोक्षरुपा ॥१॥
जगदोध्दारक तूंची कैवल्यदाता, तारक भव भय हर्ता सत्पद दावीता ॥२॥
भावे गाती ध्याती पुजीती तव चरणा, गोविंदात्मक कृष्णा लागो छंद मना ॥३॥