संत सेनान्हावींचे अभंग - वासुदेव
श्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना केली आहे. Sant Senanhavee is great sant of oldest Sant parampara.
वासुदेव
टळोनि गेले प्रहर तीन । काय निजतां झांकोन लोचन । आलों मागावया दान । नका विन्मुख होऊं जाण गा ॥ १ ॥
रामकृष्ण वासुदेवा । जाणवितों सकल जिवा । द्या मज दान वासुदेवा । मागुता फेरा नाहीं या गांवा गा ॥ २ ॥
आलों दुरुनी सायास । द्याल दान मागायास । नका करूं माझी निरास । धर्मसार फळ संसारास गा ॥ ३ ॥
एक भाव देवाकारणें । फारसें नलगे देणें घेणें । करा एकचित्त रिघा शरण । हेंचि मागणें तुम्हांकारणें गा ॥ ४ ॥
नका पाहूं काळ वेळां । दान देई वासुदेवा । व्हां सावध झोपेला । सेना न्हावी चरणीं लागला गा ॥ ५ ॥
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008

TOP