लावणी - तुज नाहींरे माझी काळजी
अनंत फंदीने लावण्ययुक्त रचना करून मराठीत लावणी अमर केली.
तुज नाहींरे माझी काळजी ॥ध्रु०॥
आपण तरि जीव द्यावा । नाहिं तरि शुद्ध हातामधिं घ्यावा विणा टाळ जी । तुज नाहींरे० ॥१॥
कोण मिळाली ठकणी । माझा रांवा उडविला गगनीं । केली राळ जी । झाली राळ जी । तुज नाहींरे० ॥२॥
कोण मिळाली विवशी । कोणीकडे नेला राजबनसी । पिटी भाळ जी । आपटी भाळ जी । तुज । नाहींरे ॥३॥
घरास आले फंदी । तेव्हां सुंदर चरणा वंदी । घाली माळ जी । सख्याला माळ जी । तुज नाहींरे० ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : December 24, 2007

TOP