मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
स्नानविधीकेलीभक्ती ॥ नामम...

अभंग ६ - स्नानविधीकेलीभक्ती ॥ नामम...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


स्नानविधीकेलीभक्ती ॥ नाममंत्राचियाआवृत्ती ॥ मगप्रत्यक्षपूजिलीमूर्ति ॥ विठोबाची ॥१॥

धन्यधन्यतोज्ञान ॥ राजानिवृत्तिनिधान ॥ विठोजीआपण ॥ भक्तासाह्ये ॥२॥

मगसकळही भक्तमेळीं ॥ सहितवनमाळी ॥ बसलेतयापाळी ॥ इंद्रायणीचे ॥३॥

एकीकेलेस्तुतिस्तोत्र ॥ एक जपतातिनाममंत्र ॥ एकगातातिवगत्र ॥ विठोबासी ॥४॥

तवपुढाराझालानारा ॥ तोनामयाचापुत्रसैरा ॥ पुसतअसेविचारा ॥ नामयासी ॥५॥

हेसंतसभेमाजी ॥ राउळीबैसलेसहजी ॥ यातेपुसीजोकाजी ॥ कोणक्षेत्रम्हणोनी ॥६॥

उठिला नामाप्रेमेडुले ॥ वंदिलींविठ्ठलपाउले ॥ करद्वयजोडोनिबोले ॥ साशंकित ॥७॥

नामाम्हणे पूर्णब्रह्म ॥ तैकैसेसभामंदिरासम ॥ तेबोलतसे परम ॥ ज्ञानदेवाभाग्ये ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP