मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत सोयराबाईचे अभंग|संग्रह १|
येई येई गरुडध्वजा । विटेस...

संत सोयराबाई - येई येई गरुडध्वजा । विटेस...

संत सोयराबाईंच्या अभंगातून विठ्ठलाशी जवळीक साधण्याचा मार्ग सापडतो.


येई येई गरुडध्वजा । विटेसहित करीन पूजा ॥१॥

धूप दीप पुष्पमाळा । तुज समर्पू गोपाळा ॥२॥

पुढे ठेवोनियां पान । वाढी कुटुंबी तें अन्न ॥३॥

तुम्हां योग्य नव्हे देवा । गोड करूनियां जेवा ॥४॥

विदुराघरच्या पातळ कण्या । खासी मायबाप धन्या ॥५॥

द्रौपदीच्या भाजी पाना । तृप्ती झाली नारायणा ॥६॥

तैसी झाली येथें परी । म्हणे चोख्याची महारी ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 25, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP