मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत सोयराबाईचे अभंग|संग्रह १|
किती हें सुख मानिती संसार...

संत सोयराबाई - किती हें सुख मानिती संसार...

संत सोयराबाईंच्या अभंगातून विठ्ठलाशी जवळीक साधण्याचा मार्ग सापडतो.


किती हें सुख मानिती संसाराचें । काय हें साचे मृगजळ ॥१॥

अभ्रीची छाया काय साच खरी । तैसेच हे परी संसाराची ॥२॥

मी आणि माझें वागविती भार । पुढील विचार न करतां ॥३॥

कां हे गुंतले स्त्रीपुत्रधना । कां ही वासना न सुटे यांची ॥४॥

सोयरा म्हणे अंती कोण सोडवील । फजिती होईल जन्मोजन्मी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 25, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP