मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय दुसरा|
श्लोक ५ वा

एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


भूतानां देवचरितं दुःखाय च सुखाय च ।

सुखायैव हि साधूनां त्वादृशामच्युतात्मनाम् ॥५॥

देवांपासूनि भूतसृष्टी । सुखदुःखें शिणे पोटीं ।

अतिवृष्टी कां अनावृष्टी । भूतकोटी आकांतु ॥५४॥

त्या देवांपरीस साधु अधिक । हें साचचि मज मानलें देख ।

देवचरितें उठी सुखदुःख । साधु निर्दोख सुखदाते ॥५५॥

त्यांहीमाजीं तुजसारिखा । जोडल्या कृपाळू निजात्मसखा ।

तैं पेठ पिके परमार्थसुखा । हा महिमा लोकां कदा न कळेचि ॥५६॥

दिधल्या सुखासी मागुती । च्युती हों नेणे कल्पांतीं ।

ते अच्युतात्मस्थिती । तुजपाशीं निश्चितीं नारदा ॥५७॥

तुझिये महिमेपासीं । मुदल देवो न ये तुकासी ।

तेंही सांगेन मी तुजपासीं । यथार्थेंसीं नारदा ॥५८॥

देवाचा अवतार होये । दासां सुख, दैत्यां भये ।

तेथही ऐसें विषम आहे । हें न समाये तुजमाजीं ॥५९॥

तूं देवांचा आप्त होसी । दैत्यही विश्वासती तुजपासीं ।

रावण तुज नेऊनि एकांतासी । निजगुह्यासी स्वयें सांगे ॥६०॥

देव रावणें घातले बंदीं । तो रावण तुझे चरण वंदी ।

शेखीं रामाचा आप्त तूं त्रिशुद्धी । विषम तुजमधीं असेना ॥६१॥

जरासंधु कृष्णाचा वैरी । तुझी चाल त्याच्या घरीं ।

आणि कृष्णाचे सभेमाझारीं । आप्तत्वें थोरी पैं तुझी ॥६२॥

नाम घेवों नेदी देवाचें । हें बिरुद हिरण्यकशिपूचें ।

त्यासी कीर्तन तुझें रुचे । विषमत्व साचें तुज नाहीं ॥६३॥

लांचुगी बुद्धि सदा देवांसी । तैशी नाहीं तुम्हां साधूंसी ।

ऐक त्याही अभिप्रायासी । यथार्थेंसीं सांगेन ॥६४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP