|
उ.क्रि. अपमान करणें ; तिरस्कारानें , तुच्छतेनें वागविणें ; अनादर करणें ; त्याग करणें . तें देखिलेयां दुर्योधनें । अव्हेरिलें कवणे मानें । - ज्ञा १ . ९२ . द्विजगुरु तीर्थें जे अव्हेरिति । त्या टाकिति नरकमूत्रीं । हेळसांड , उपेक्षा , दुर्लक्ष्य , हयगय करणें ; अव्यवस्थित , धूळखात पडणें ; दुर्दशा होणें ( भांडीं - कुंडीं , पुस्तकें , खोल्या , जागा वगैरे ). [ सं . अव + धीर , प्रा . अवहीर - अवहेरी = अवगणन ]
|