Dictionaries | References अ असूं दे माझें चोरटें, घरदार राखतें Script: Devanagari Meaning Related Words असूं दे माझें चोरटें, घरदार राखतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतःचे मूल, बाळगलेले जनावर चोरटे असले तरी ते आईबापाला, धन्याला नकोसे होत नाही. त्याने जरी घरांत चोरी केली तरी निदान दुसर्यांपासून घराचे रक्षण करते व दुसर्याचा घरांत प्रवेश होऊं देत नाही, या दृष्टीने ते उपयुक्त ठरते. काही काही मांजरे चोरून काही जिन्नस खातात किंवा दूध वगैरे पितात. तरीहि ती उदरांपासून घराचे रक्षण करतात या दृष्टीनें तरी त्यांचा उपयोग असतोच. म्हणून अशा बाबतीत ही म्हण वापरतात. यावरून ज्याच्या अंगी काही सद्गुण आहेत त्याच्या अंगी जरी एखादा दुर्गुण असला तरी तो क्षम्य मानला जातो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP