Dictionaries | References

आधव्याचें आलें राज, डोक्याला सुटली खाज

   
Script: Devanagari

आधव्याचें आलें राज, डोक्याला सुटली खाज

   (व.) (आधव्याचेः = अधव्याचे, हक्क नसतां अकल्पित लाभलेले) अकल्पित लाभलेले राजवैभव ज्याला प्राप्त होते तो इतका गर्विष्ठ व ऐदी बनतो की, स्वतःच्या डोक्याला खाज सुटली तर इतरांप्रमाणें स्वतःच्या हातांनी ते न खाजवितां तो लोकांना अधिकाराच्या जोरावर फर्मावितो की, माझे डोके खाजवून द्या. तेच परंपरागत राजवैभव ज्याला असते त्याला असा फाजील मद चढतच नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP