Dictionaries | References

उंडण

   
Script: Devanagari
See also:  उंडणी

उंडण     

 स्त्री. उंडी ; उंडीचें झाड . हें कोंकणांत होतें . याची पानें सुरंगीच्या पानांसारखीं मोठीं , गुळगुळीत , स्वच्छ असून पत्रावळी करतां येण्यासारखीं असतात . फूल पांढरें , सुवासिक असतें . फळें सुपारी एवढीं असून बियांचें तेल जाळावयाच्या उपयोगी पडतें . त्यास उंडेल म्हणतात . हें खरजेवर औषधी आहे . - वगु १ . ६० . [ सं . पुन्नाग . ]
 स्त्री. 
किडी ; आळी . उंडणी लंघू न शके भिंतीसी । - एभा ५ . ९३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP