Dictionaries | References

कळसुत्री

   
Script: Devanagari

कळसुत्री

 वि.  कळसुत्राची ; कळसुत्रासंबंधी . - स्त्री . ( ल .) क्रांति ; अचानक झालेली उलथापालथ . ' कशी एकाएकी झाली धन्य कळमुत्री । ' ऐपो ४०४ .
०बाहुलें  न. १ वाहुल्याचें अवयव जसें पाहिजेत तसें फिरावे म्हणुन युक्तीनें त्याच्या अंगातून तारा नेलेल्या असतात , त्या तारांच्या योगानें त्या बाहुल्यांना पाहिजे तसें नाचवितां येते , अशा बाहुल्यांपैकी प्रत्येक . प्राचीनकाळीं कळसुत्री बाहुल्यांच्या खेळाचा प्रचार सर्वत्र असें . ' सुत्रधार ' हा शब्दहि त्यावरुन आला . २ ( ल .) स्वतःस कांहीं ठाम मत नसून दुसर्‍याच्यामतानें वागणारा माणुस ; कोणाच्या तरी कह्यांत राहणारा , पुळपुळीत माणुस . ' बाजीरावाचें कळसुत्री बाहुलें आपले हातीं बरें सांपडलें असें बाळोबास वाटलें ' - अस्तंभा १९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP