Dictionaries | References

कळा

   
Script: Devanagari
See also:  कला

कळा     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  चंद्रीम वा ताच्या चान्न्याचो सोळावो अंश वा भाग   Ex. पुनवेचो चंद्रीम आपल्या सोळाय कळांनी भरिल्लो आसता
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चंद्रकळा
Wordnet:
benকলা
gujકળા
hinकला
kanಚಂದ್ರಕಲೆ
malകൃത്യമായ തൂക്കം
marचंद्रकला
oriକଳା
panਕਲਾ
sanकला
tamகலை
telచంద్రవంక
urdفن , کلا , ہنر , سلیقہ

कळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: a large कळी in some other senses. See कळी, of which word this is the intensive or enhancing form. 2 From कला and used in all its senses.

कळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A large bud.
 f  An art, &c. See कला.

कळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या ओटीपोटात होणार्‍या वेदना   Ex. कळा सुरू झाल्यावर तिला दवाखान्यात भरती केले.
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेणा
Wordnet:
hinप्रसव पीड़ा
sanप्रसववेदना
See : चंद्रकला, टवटवी

कळा     

 पु. १ फुलाची मोटी कळी ; कोरक ; कळीचें मोठें स्वरुप , ' तो कनक चंपकाचा कळा । ' - ज्ञा ६ . २५७ . २ केळ . - एभा २ . ५७७ . ३ चौफुला वगैरेस शोभेसाठीं कळीच्या आकाराचें हातांत धरण्यासाठीं जें बोंड बसवितात . तें . ४ बुगडीचा वरचा कळीसारखा भाग . ( सं . कलिका )
 स्त्री. १ कला या शब्दाच्यासर्व अर्थी योजतात . ' कीं हें नाना कळांचें जीवन । ' - दा १ . ७ . २ . ' असो सकळ कळा प्रवीण । विद्यामात्र परिपूर्ण । ' - दा . २ किरण ; प्रकाश . ' जैसें शारदीयेचे चंद्रकळे । माजीं अमृत कण कोंवळें । - ज्ञा . १ . ५६ . ३ तेज . ' तैसें पिंडाचेनि आकारें । तें कळाचिकां अवतरे । ' - ज्ञा ६ . २५० . ' जनविजन समान कळा । तेचि आपाद वनमाळा । ' - एरुस्व १ . ४१ . ४ चंद्राचा १६ वा अंश ; त्यावरुन वोसावला । ' - ज्ञा १५ . ३०३ . ' चंद्रासि लागति कळा उपराग येतो । ' - र २ . ५ मनस्थिति . ' काय भाव एक निवडूं निराळी । जाणसी तूं कळा अंतरींची । ' - तुगा १६१३ . ६ देखावा ; दशा . ' दावूनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा । ' - तुगा २८३५ . ७ युक्ति . ' कळा तुजपाशीं आमुचें जिवन । उचित करुन देई आम्हां । ' - तुगा ९ . ८ चातुर्य ; करणी ' पाव्यामाजी रागज्ञान । केल्या अति मधुर गायन । तो पाव्याचा नव्हे गुण । कळा जाण गात्याची । ' - एभा १० . २६७ . ज्याची कळा तोच जाण । ' - ऐपो १४४ . ९ ज्ञान . ' कस्तूरीचा वास घेईन काऊळा । तरिच ती कळा कळे तया । ' - ब ९८ . १० हालचाल ; चलनवलन . ' शरीरांतूनिया प्राण गळाल्या लोपति सर्व कळा । ' - रत्‍न ४ . ३ . ११ प्रकार ' जेवीं माउली देखोनि डोळा । बालक नाचे नाना कळा । ' - एभा ३ . ५९९ . ( सं . कला )
 स्त्री. १ लिहिणें , वाचणें , गाणें , घोड्यावर बसणें , चित्रें काढणें इ० कौशल्याची कामें ; कला चौसष्ट आहेत . चौसष्ट कला पहा . २ चतुराईची यांत्रिक वगैरे योजना ; तिच्या रचनेचें ज्ञान . चालविण्याची युक्ति ; त्यांपासुन विवक्षित फल उप्तन्न करण्याचें चातुर्य ; त्याची गुप्त खुबी , किल्ली , मख्खी ; यटक . ३ चतुराई ; बुद्धिकौशल्य ; शोधक बुद्धि ; कसब ; युक्ति ; लीला . ' तुका म्हणे त्याची कोण जाणें कळा । वागवी पांगुळा पायवीण । ' - तुगा ३६७७ . ' तयांत फिरती तरी करिती अप्सरांच्या कला ' - नरहरी , गंगारत्‍नमाला १४३ . ( नवनीत पृ . ४३२ .) ४ चंद्राच्याबिंबाच्या सोळावा भाग ; प्रत्येक दिवशीं वाढणारी किंवा कमी होणारी चंद्राची कोर . ' चंद्राची लगती कळा । उपराग येतो । ' - र २ . ५ वेळाचें एक परिमाण सुमारें ८ सेकंदाबरोबर ; ३० काष्ठा म्हणजे एक कला . ६ एक अंशाचा ( वर्तुळाच्या ३६० व्या भागाचा ) एकसांठांशाचा भाग . ७ पदार्थमात्राचा ( सोळावा किंवा लहानसा ) अंश ; लेश ; लव ; तीळ ; रज ; कन . ८ कांति ; टवटवीतपणा ; स्वच्छपणा ; नितळपणा ; सौंदर्य ; तेज चमक ( माणसांच्या चेहेर्‍यावरील ). ' राजसुकुमार मदनाचा पुतळा । रविशशि कळा लोपलिया । ' - तुगा २ . ' घराची कळा अंगण सांगते .' ९ सूर्य ; पृथ्वी व परप्रकाश खस्त पदार्थ यांमध्यें कोण झाल्यामुळें पृथ्वीवरुन त्या पदार्थाची जी कांही प्रकाशित व अप्रकाशित आकृति दिसते ती . - सृष्टिशास्त्र १३८ . ग्रहांच्या प्रकाशित भागाचा जो अंश आपणाम्स वाढतांना किंव कमी होतांना दिसतो तो . - ब्रूस , ज्योतिःशास्त्राची मुलतत्त्वें . १० ( प्रणिशास्त्र ) शरीरांतील नाजुक त्वचेसारखा पडदा . ( इं .) इंटरनल मेंब्रेन . ११ ( अश्व ) कुच आणि कुष्किका घोड्याचें अवयव . - अश्वप ६४ . १२ ( ताल ) मात्रा ; नियमा नुसर तालाचे झालेले भाग ; हें आठ आहेत ध्रुवका ; सर्पिणी , कृष्णा , पद्मिणी ; विसर्जित ; विक्षिप्ता ; पताका व पतिता . १३ ( ताल ) खाली ; टाळी न वाजविणें . १४ शास्त्राचा व्यावहारिक उपयोग ; कोणत्याहि उद्दिष्ट विषयास उद्दिष्ट प्रसंगीं शास्त्रीय सिद्धांत लागू करणें ( शास्त्र यांच्या विरुद्ध .) - सुकौ १२ . ( सं .)
जीवंतमध्ये पहा .
०जाणें वि.  ( व .) अवनति होणें ; दुर्मखलेलें दिसणें . त्याच्या अठरा कारखान्याच्या गेल्या कळा । ' - ऐपो १४२ .
०तीत वि.  अत्यंत सूक्ष्म ; अंशाच्या विभागाच्या पलीकडला ; मायेच्या पलीकडला .' कलितकाळ कौतुहल । कलातीत । ' - ज्ञा १८ . ३ ( सं .)
०फूल  न. १ एक औषधासाठीं वाळविलेली फुलाची कळीं . २ कोणतेंहि कलीच्या आकाराचें फुल .
०निधि  पु. चंद्र , ' आल्हादकारक कलानिधि परंतु न्यून क्शयासहित । ' - सीता स्वयंवर . ( नाको .) ( सं .)
०ईत वि.  कुशल ; कलावान ( मनुष्य ).
०मोगरा  पु. ( सोनारी ) मोगर्‍याच्या फुलांच्या कळीसारखा आकार दिलेला कोणत्याहि दागिन्याचा भाग . कळी पहा .
०कळी  स्त्री. मर्म ; कौशल्य . ' तेआं जुंझाची कळाकळी । ते देशंचि वेगळी । ' - शिहु ८७९ .
०कांती  स्त्री. ( शरीराची , चेहर्‍य़ाची , देहाची ) चमक ; सतेजता ; तेज ; टवटवी . ' परम मळीण दिसती । कळाकांती नसे कांहीं । ' -
०कुशलताकौशल्य   स्त्रीन . कसब व चातुर्त्य ; नैपुण्य व कारामत ; शहाणपणा व बुद्धि .
०कुसरी  स्त्री. १ ( कुसरी हा शब्द लुप्त झाला असुन बहुधा कला शब्दाबरोबर अधिक जोर येण्याकरितां योजितात ) चातुर्यांची कल्पना ; युक्ति ; करामत ; कुशलतेची रचना ; शहाणपणाची योजना ; २ कौशल्य ; कसब ; कारागिरी ( गाणें , चित्रकला इ०तील ). ' परिच्या संगावांचूनि सर्व स्त्रीच्या वृथा कळाकुसरी । ' - मी . ३ बारीक नक्षीकाम ( जीगचेंकाम , भारतकाम इ० ) ( अनेकवचन ; कळा = कुशलता + कुसरी )
०खाऊ   घाण - वि . १ एखाद्याच्या मोठेपणास , अब्रूस काळिमा आणणारा . २ जो दुसर्‍याला मुर्ख बनवितो , घोटाळ्यांत , गोत्यांत आणतो तो . ' घरी कळाखाऊ अवळा नसावी अशी । अवघा वेळ रागामधी नागीण घुसघुशी । ' - पला ८० . २ ( व्यापक .) शोभा येण्यासाठी , सौंदर्यासाठीं कोणतीहि गोष्ट केली असतां तिचा ज्यावर परिणाम होत नाहीं अशी व्यक्ति ( विशेषतः स्त्रिया व मुलें ); घाणेरडा ; कळाहीन ; मळकट ; घाण . ' कळाखाऊ कपडे घालून जर गेलात तर काम कसें होईल ?
०तीन  स्त्री. ( व .) कळांवंतीण . ०धर - वि . कलावान ; पंडित ; विद्वान . ' जितेके कळाधन पृथ्वीवरी । जे जे आले शाहूनगरी । ' - निमा ( आत्मचरित्र ) १ . १०६ .
०निधि  पु. १ चंद्र . २ ज्याच्यापाशीं पुष्कळ कला आहेत असा .
०न्यास वि.  अनेक कलाकौशल्यानें बनविलेलीं ; नक्षीदार . ' पांचा आंगोळियां विन्यास । कळान्यास मुद्रिका । ' - एरुस्व १५ . ५३ .
०पात्र वि.  कळावान ; कलावंत . ' विद्यापात्रें कळापात्रें । विशेष गुणांची सप्तात्रें । ' - दा . १ . ८ . २३ . - न . कलावंतीण . ' तों सभेसी आलीं कळापात्रें । श्रीची लीला वर्णिती विचित्रें । त्या गौरविल्या राजीव नेत्र । वस्त्रें भूषणें देवोनियां । ' - ह . २९ . १५१ .
०वंत वि.  कलावंत पहा .
०वतो   वंती वंतीण - स्त्री . कलांवंतीण , कळवंतीण पहा . ' कलावती ते करी दरिद्र । कामिका पाश घालूनि । ' - दावि ४५१ .
०विद वि.  कलावन ; कुशल . ' तें कळाविदीं आइकावी । अवधान देओनी । ' शिशु ६५१ .
०विदपण  न. कुशलता . ' एथ कळाविदपण देओनी । ' - शिशु ६५१ .
०विदपण  न. कुशलता . ' एथ कळाविदपणा कळा । ' - ज्ञा २ . ३७ .
०सूत्र  न. कळसुत्र पहा .
०सुत्राचा  पु. कळसुत्री बाहुल्यांचा खेळ .
खेळ  पु. कळसुत्री बाहुल्यांचा खेळ .
०सित्राची   स्रि . विशिष्ट प्रकारच्या दोर्‍यांनी हालणारी बाहुली .
वाहुली   स्रि . विशिष्ट प्रकारच्या दोर्‍यांनी हालणारी बाहुली .
०सूत्री वि.  कळसूत्री पहा .

कळा     

कळाखाऊ
१. कळाहीन
घाणेरडा. २. अब्रू घालविणारा
काळिमा आणणारा. ‘घरी कळाखाऊ अबला नसावी अशी।’ -पला ८०.

Related Words

कळा   होती कळा   कळा जाणें   उतरती कळा   चढती कळा   अंगीं नान कळा पण वेष बावळा   कळा कळा करणें   जाणती कळा   मरती कळा   सोळा कळा   ಚಂದ್ರಕಲೆ   കൃത്യമായ തൂക്കം   श्रीमंतीला उतरती कळा आणि गरिबीला चढती कळा   कला   अंगणावरून घराई कळा (ओळखते)   श्रीमंती खाशाचीः घरीं कळा जोशाची   చంద్రవంక   कळा ना कथा, चव ना चोथा   उत्तम कळा उत्तम ज्ञान, न ये विद्येवांचून   चंद्रकला   ਕਲਾ   કળા   कळा नाहीं कांति नाहीं, युक्ति बुद्धि कैसी त्‍याच्या ठायीं   उंची वस्तु अल्प मोला, त्या राष्ट्रीं मोडती कळा   वेष असावा (धरावा) बावळा। अंतरीं असाव्या नाना कळा॥   ज्ञानावीण जी जी कळा, ती ती मानावी (जाणावी) अवकळा   नासलें फळ दुसर्‍या फळा, नासून हरी त्याची कळा   କଳା   கலை   কলা   करमुइ   बुडता पाया   आंत पाणी शिरणें   decline phase   चंद्रकळा   घुबा   पडता काळ   उजवी गुढी देणें   उजवी देणें   कडसणीस लागणें   निष्कळ   decadence   हराष   खालावणे   उतरती दशा   उतरत्या पायरीस लागणें   आटण   थटथट   तिसरून   मणिभूमिकाकर्म   पडता पाया   परडें उतरणें   stigmatic   उतरती पायरी   कलाकौशल्य   कळपाट   खचता पाया   जातीविति   बढती   परडें बसणें   प्रसुतीकाळ   सोपणानं सोपण खालतें   खेवो   आसन्नप्रसव   उताराखाली असणें   उताराखाली पडणें   कळंजणें   अंगणावरून घरस्‍थित जाणावी   घसरगुंडी   विकळा   शियारी   अटणूक   अवनती   जातापाया   चढती कमान   बारा वाजणें   रुणा   माल्यग्रथन   पोट दुखणें   र्‍हास   निकर्श   कळाविया   कळावी   काकडणें   करंबुटी   ओसरणे   ओहटणें   ओहोटी   अपक्षीण   नवरकळा   अवकळा   कळो   उठकळा   कया   एकवळा   ओहटी   किसमिस   ग्लांति   घसर   चंद्रामृत   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP