|
न. १ मुंबई इलाख्यांतील एक प्रांत . सह्याद्रीच्या पश्चिमेकडील प्रदेश . सध्यांचें ठाणें , कुलाबा व रत्नगिरी हे तीन जिल्हें , सांवतवाडी संस्थान आणि गोमंतक यांचा कोंकणांत अंतर्भाव होतो . ( त्यांचे , तुमचें इ० ) बैल कोंकणांत जाणें - १ शक्तिहीन होणें . २ वयपरत्वें दुर्बल होणें ; अशक्त होणें . ३ नपुंसक होणें . ;' मासे हात का कोंकणांत गेले ' ? = मी , काय अशक्त झालों ? ( का . कोंग् + कण् = मावळ दिशा , कुंगु = मावळनें ; किंवा कोंकु = बांक , वांकडेपणा ?) ०धार स्त्री. करकोची पक्षीण . ०दुधी पु. ( गो .) दुध्या भोपला . ०पट्टी स्त्री. कोंकण किनारा ; कोंकण पहा . ०स्थ पु. महाराष्ट्र ब्राह्मणांची एक पोटजात ; चित्पावन ब्राह्मण . ( सं .) ०स्थी वि. चिप्तावन ब्राह्मणाजातीसंबंधी ; कोंकणस्थांचा ( बेत , व्यवहार , कारभार इ० )
|