Dictionaries | References

क्षिती

   
Script: Devanagari

क्षिती

 ना.  काळजी , किंमत , चिंता , पर्वा , फिकिर ( नकारार्थी प्रयोग ).

क्षिती

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : तमा, पृथ्वी

क्षिती

  स्त्री. १ पृथ्वी . परब्रह्म क्षितीं उतरलें । - तुगा १०३ . २ ( संगीत ) चौदाव्या श्रुतीचें नांव . ३ खराबी ; नासाडी ; र्‍हास ; उतरती कळा ; क्षय . [ सं . ] क्षितिज - न . आकाश जेथें जमीनीस लागलेलें दिसतें ती वर्तुळाकार मर्यादा . क्षितिजलंबन - न . खस्थ पदार्थ क्षितिजांत असतां त्याचें असलेलें मोठें लंबन . - सूर्य २५ . क्षितिजसमसूत्र - वि . क्षितिजाच्या सरळ पातळींत असलेलें ; पृथ्वीच्या पृष्ठभागाशीं सपाट असलेलें . क्षितिज्या - स्त्री . ( ज्यो . ) चराशीं जुळणारी द्युज्यासमांतरवृत्ताची भुजज्या . उदयापासून उन्मंडलापर्यंत पोहोंचेतोवर सूर्यास अहोरात्र वृत्ताचे जे अंश आक्रमावे लागतात त्यांच्या वृत्तावरील ( द्युज्याकर्णीय ) भुजज्या . - भाज्यो ३४ . क्षितीश - पु . राजा ; भूपति . न्यायातें पोषी क्षितीशु । - ज्ञा १८ . १८०४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP