Dictionaries | References

गोंधळ

   
Script: Devanagari

गोंधळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; confusion and perplexity gen. 2 Bewilderment, distraction, botheration. 3 Bustle, stir, hurry-skurry, hurly-burly. 4 A tumultuous festivity in propitiation of देवी; corresponding somewhat to Wake or Ale. 5 Hurried and tumultuous, or animated and vivid action gen. v घाल. Pr. गाढवांचा गों0 लातांचा सुकळ.

गोंधळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Disorder or derangement. Bewilderment. Bustle. गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ.
$A tumultuous festivity in propitiation of देवी.
गोंधळ घालणें   To make a mess of a thing or create confusion.

गोंधळ     

ना.  अंदाधुंदा , अव्यवस्था , अस्ताव्यस्तपणा , कोलाहल , गडबड , घोटाळा , तारांबळ , दगदग , धांदल , धामधूम , धावपळ , धावाधाव , धुडगूस , हंगामा .

गोंधळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कुळधर्म म्हणून गोंधळ्याकडून देवीप्रीत्यर्थ करवून घेतला जाणारा, गाणे, नृत्य यांचा समावेश असलेला एक विधी   Ex. दादाच्या लग्नानिमित्त उद्या गोंधळ आहे.
See : घोटाळा, तारांबळ, संभ्रम, अशांती, अव्यवस्था

गोंधळ     

 पु. १ अव्यवस्था ; अस्ताव्यस्तपणा ; घालमेल ( वस्तु , काम हिशेब यांत ). २ अंदाधुंदी ; घोंटाळा ; दगदग ; त्रास . ३ धांदल ; गडबड ; तारांबळ ; कां उपभोगाचे गोंधळ । - दा २ . ५ . २६ . ४ धांवाधांव ; धांवपळ ; धामधूम . ५ देवीच्या कुलधर्मात देवीप्रीत्यर्थ गोंधळी लोकांकडून करावयाचें गाणें , नाचणें , कीर्तन , देवीचें भजन , स्तुति . वेदवाचा वरदायिनी । गोंधळ गाती इयेचा । - मुआदि ४ . १२८ . ६ गडबडीचा , आरडाओरडीचा प्रकार ; कोलाहल ; धुडगूस . ( क्रि० घालणें ). [ सं . गुध = खेळणें ? सं . गुंदल = एका वाद्याचा आवाज ; तुल० का गोंदल ] ( वाप्र . )
०घालणें   १ ( गोंधळाप्रमाणें ) अव्यवस्थितपणें वागणें , वाटेल तसें वागणें . खर्चापुरतें दिलें असतें फेंकून अन म्हटलें असतें घाला गोंधळ . - रंगराव २ धुडगूस घालणें ; गडबड करणें . गोंधळणें , गोंधळविणें - उक्रि . अव्यवस्था , घालमेल करणें ; घोळ घालणें ; एकत्र करणें ; मिसळणें . - अक्रि . १ गैरविल्हे लागणें ( वस्तु ). पोथी गोंधळली ती नीट लावतों . २ भोंवडणें ; भ्रमणें ; भोंवरा होणें ( वारा , पाणी यांचा संकुचित जागेंत ). ३ चोहोंकडे झटक्यानें फेंकलें , गुरफटलें जाणें ( गवत , धूळ ). ४ घाबरणें ; त्रेधा उडणें ; भांबावणें ; घोंटाळयांत पडणें . म्ह० गाढवांचा गोंधळ , लाथांचा सुकाळ . सामाशब्द - गोंधळलग्न - न . गोधूल लग्न पहा . गोंधळी - पु . १ देवीचा गोंधळ घालणारी जात व व्यक्ति . हे गातात , नाचतात व कोठेंकोठें वाद्येंहि वाजवितात . २ भिक्षेकर्‍याची एक जात . [ गोंधळ ; का . गोंदलिग ]

गोंधळ     

गोंधळ घालणें
[ लग्‍नादिकार्यानंतर काही जातींत गोंधळी लोकांकडून देवीचा गोंधळ करवून घेण्याचा प्रघात आहे. हा गोंधळ फार अव्यस्‍थित कंटाळवाणा आरडा ओरडीचा होतो.] १. अव्यवस्‍थितपणें वागणें
वाटेल तसे वागणें. २. धुडगूस घालणें
गडबड करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP