Dictionaries | References त तारंबळ उडणें Script: Devanagari See also: तारंबळ होणें Meaning Related Words तारंबळ उडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [तारंबळ, तारामळ, तारांबळ=ताराबलनक्षत्रांची अनुकुलता.]‘तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव’ हा मंगलाष्टकाचा श्र्लोक मुहूर्ताची घटका संपत आली म्हणजे फार घाईने म्हणतात. यावरून घाई, धांदल होणें. ‘मी आपुल्या गृहीची एक। तारंबळ होतसे।।’ -नव २०.५५. ‘जिजाऊ-(रुसव्या स्वरानें) माझी अशी तारांबळ उडावी, आणि आपण मौज पहात रहावे हे चांगले वाटले ना?’ -शिसं १.१.अडचण, ओढगस्तपणाहाल. ‘आपले सैन्य इंग्रजांपाशी चाकरीस ठेवण्याचा तह करण्याविषयी गव्हर्नरचा नानास आग्रह चालला होतापण त्यास त्यांतला मतलब कळून एकंदर राज्याची जरी तारांबळ झाली होती तरी तो कबूल झाला नाही.’ -निबंधमाला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP