|
स्त्री. १ तपकीर . २ नाकाने ओढण्याचे , नाकांत घालण्याचे औषध . - एभा १० . १६ . [ सं . नस्य ; हिं . ] पु. १ नाश पहा . २ नाश करणारे एक पिशाच्च . [ सं . नाश ] नासकवणी - न . दूषित , नासके बिघडलेले पाणी किंवा रस . [ नासके + पाणी ] नासका - वि . १ नासलेला ; नाशित पहा . २ सहज , कवकर नासणारा , बिघडणारा , नष्ट होणारा ; न टिकणारा . नासके केणे - न . १ लवकर खराब होणारा , नासणारा . ( फळे , भाजीपाला वगैरे विक्रीचा ) जिन्नस . २ नासलेला अथवा बिघडलेला जिन्नस . ३ ( ल . ) वाईट किंवा दुबळी वस्तु , प्राणी वगैरे . ( उदा० लग्नासाठी दाखविलेली ओगट मुलगी ; विकावयास आणलेला दुबळा तट्टू इ० ) [ नासके + केणे = पदार्थ ] नासडा - पु . पूर्ण नाश - तोटा . नासाड पहा . नासणे - उक्रि . १ नाशणे पहा . २ वायां जाणे . तरी सांगावे सुहृदी कथिला जो मंत्र तो न नासेल । - मोविकृ ८८ . ६१ . ३ गुण किंवा सत्त्व नाहीसे होणे . म्ह ० नासली मिरी जोंधळ्याला हार जात नाहीत किंवा जोंधळ्याला विकत नाहीत . ४ - अक्रि . ( ल . ) मरणे . लग्न केले परी भ्रतार नासला । हितावह झाला तोहि मज । - ब ९५ . इतर अर्थी नाशणे पहा . [ सं . नाशन ] ०तूस धूस धोस धूळ - स्त्रीपु . १ अत्यंत नासाडी ; सत्यानाश ; धूळधाण ; दुर्दशा . २ व्यापारांत बूड , तोटा . ( क्रि० येणे ). [ नाश द्वि + धूळ ] नासरा - वि . नाशक , नाशा पहा . ०वणी न. १ पिकाची नासाडी करणारा पाऊस . २ नासकवणी पहा . ०वीट पु. ( व्यापक . ) नाश ; नुकसान ; खराबी . ( क्रि० करणे ; होणे ). [ नाश + वीट ] नासाड डा डी स्त्रीपुस्त्री . ( नाशचा अतिशय ) पूर्ण विध्वंस ; पुरापूर नाश , बूड . नासडा पहा . नासाड केले हो आमुचे कर्म । - दावि ७८४ . नासाड्या वि . नासाडी करणारा . नासावणे अक्रि . कमी दिवसांचे बाळंत होणे ; धुपावणे ; वाखा होणे ; गर्भपात होणे ; दुवेतणे .
|